Serious murder of a disabled woman at Kharda | खेर्डा येथे दिव्यांग महिलेची निर्घुण हत्या

खेर्डा येथे दिव्यांग महिलेची निर्घुण हत्या

ठळक मुद्दे याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.महिलेचा मृत्यू हा संशयास्पद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम खेर्डा खुर्द येथे 6 डिसेंबरच्या रात्री लिलाबाई मोतीराम खरात या दिव्यांग अविवाहित  महिलेची घरात निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार 7 डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटना कशामुळे घडली असावी याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.
 या बाबत माहिती अशी की सदर   महिला ही तिचा चुलत भाऊ महादेव मांगोजी खरात यांच्या घरी खेर्डा खुर्द येथे एकटीच राहत होती. तिला आई-वडील भाऊ वगैरे कोणीही नाही. घटनेच्या दिवशी तिच्यासोबत चुलत भावाची नऊ वर्षीय मुलगी शारदा ही सुद्धा त्या घरात झोपलेली होती. ती तिसऱ्या वर्गात आहे. घटना उघडकीस येतात स्थानिक पोलीस पाटील योगेश म्हसाळ यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दिली त्यानंतर तात्काळ पोलीस पथक ठाणेदार सुनिल जाधव यांचे नेतृत्वात खेर्डा येथे दाखल झाले त्यांनी सदर घटनेची, तसेच घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी आरोपीचा छडा लावण्यासाठी डॉग स्कॉड बोलावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. महिलेचा मृत्यू हा संशयास्पद असून तिच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.  (प्रतिनिधी )

Web Title: Serious murder of a disabled woman at Kharda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.