आरटीई प्रवेशाची मुदत पुन्हा वाढली; २२६ विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:44 AM2020-11-04T11:44:10+5:302020-11-04T11:44:55+5:30

Buldhana RTE admission News कोरेाना संसर्गाममुळे यापूर्वी अनेकवेळा मुदत वाढ देण्यात आली आहे.

RTE admission deadline extended again; Consolation to 226 students | आरटीई प्रवेशाची मुदत पुन्हा वाढली; २२६ विद्यार्थ्यांना दिलासा

आरटीई प्रवेशाची मुदत पुन्हा वाढली; २२६ विद्यार्थ्यांना दिलासा

Next

 बुलडाणा : आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी पुन्हा ५ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.  कोरेाना संसर्गाममुळे यापूर्वी अनेकवेळा मुदत वाढ देण्यात आली आहे. परंतू प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.
बालकांच्या माेफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी शाळांमध्ये आर्थीक दृष्ट्या दुर्बलांना २५ टक्के आरक्षण देण्यात येते. दरवर्षी ही प्रक्रीया जानेवारीपासून राबवण्यात येते. मात्र, यावर्षी काेराेनामुळे ही प्रक्रीया खाेळंबली आहे. अर्ज केलेल्या बालकांची लाॅटरी काढल्यानंतर प्रवेशीत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा हाेता. काेराेनामुळे या प्रक्रीयेला विलंब हाेत आहे. अनेक वेळा प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देउनही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे, आता ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
बुलडाणा जिल्ह्यात २३१ शाळांमधील २ हजार ७८५ जागांसाठी ही प्रक्रीया राबविण्यात आली हाेती. त्यासाठी जिल्ह्यातील ६ हजार ५१० पालकांनी अर्ज केले हाेते. त्यापैकी २ हजार ६९९ विद्यार्थ्याची निवड करण्यात आली हाेती. जिल्ह्यातील  २ हजार २७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. तसेच २२६ विद्यार्थ्यांना आता ५ नाेव्हेंबर पर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. 
ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला त्यांनी प्रवेश घेण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. ज्या शाळांमध्ये नंबर लागला त्या शाळांनी तसेच गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती व इतर लाेकप्रतिनिधींनी जनजागृती करण्याची गरज आहे.

Web Title: RTE admission deadline extended again; Consolation to 226 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.