नोंदणी साडेचार हजारावर, आवक मात्र शुन्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 03:00 PM2019-11-22T15:00:54+5:302019-11-22T15:01:14+5:30

आतापर्यंत सोयाबीन व उदिडाची एक क्विंटलही आवक नाफेडकडे आली नाही.

Registration at four and a half thousand, inward but zero! | नोंदणी साडेचार हजारावर, आवक मात्र शुन्यावर!

नोंदणी साडेचार हजारावर, आवक मात्र शुन्यावर!

Next

- ब्रम्हानंद जाधव  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आधारभूत किंमतीनुसार नाफेडकडून शेतमालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५२३ शेतकऱ्यांनी सोयाबीन व उडिदाची आॅनलाइन नोंदणी केली आहे. मात्र आतापर्यंत सोयाबीन व उदिडाची एक क्विंटलही आवक नाफेडकडे आली नाही. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालासाठी नाफेडलाही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
जिल्ह्यात नाफेडच्यावतीने शेतमालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभुत दराने करण्यात येत आहे. या खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन, उडीद व मुंग या शेत मालाची आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. आतापर्यंत सोयाबीन व उडीद या शेतमालाची साडेचार हजार शेतकºयांनी नोंदणी केली. परंतू सोयाबीन व उडीद पिकालाना अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकºयांचे सोयाबीनचे पीक काळे पडले आहे. त्यामुळे काळे पडलेले सोयाबीन नाफेडकडे विक्री केल्या जाऊ शकत नाही. परिणामी सोयाबीन व उडीदाची आवक नाफेडकडे झालेली नाही. आतापर्यंत केवळ मूग या पिकाचीच खरेदी नाफेडकडून करण्यात आलेली आहे.

मुगाची तीन हजार क्ंिवटल खरेदी
जिल्ह्यात नाफेड अंतर्गत केवळ मूग खरेदी आतापर्यंत झालेली आहे. त्यातही आवक पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही. मूग शेतमाल विक्रीसाठी ६ हजार १९७ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ३ हजार ६० क्विंटल मुगाची खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परतीचा पाऊस येण्यापूर्वी मुगाची काढणी झाली होती. त्यामुळे तर काही ठिकाणी मूग काढणी सुरू असताना पावसाचा फटका बसला. परंतू मूगाच्या तुलनेत सोयाबीन व उडीद पिकाला पावसाचा मोठा बसला आहे. त्यामुळे नाफेडकडे आतापर्यंत सोयाबीन व उडीदाची आवक झालेली नाही.

Web Title: Registration at four and a half thousand, inward but zero!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.