पावसाचा कहर; दोन पूल वाहून गेले, शेतीचेही झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:02 PM2021-06-17T12:02:03+5:302021-06-17T12:02:12+5:30

Buldhana News : कोराडी नदीला पूर आल्यामुळे सवडद ते गजरखेड रस्त्यावरील पूल हा वाहून गेला आहे.

Rainstorm; Two bridges were swept away, and agriculture was damaged | पावसाचा कहर; दोन पूल वाहून गेले, शेतीचेही झाले नुकसान

पावसाचा कहर; दोन पूल वाहून गेले, शेतीचेही झाले नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : परिसरात १५ जूनला पडलेल्या दमदार पावसामुळे सवडद आणि उमनगाव येथील दोन पुलांचे मोठे नुकसान झाले असून साखरखेर्डा मंडळामध्ये दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यातच पावसामुळे साखरखेर्डा ते मेरा बुद्रुक रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे.
साखरखेर्डा मंडळामध्ये बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७४ मिमी पावसाची नोंद झाली. अवघ्या १ मिमी पावसामुळे तांत्रिकदृष्ट्या या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद होऊ शकली नाही. मात्र, या मंडळात पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
या पावसामुळे सवडद येथील कोराडी नदीला पूर आल्यामुळे सवडद ते गजरखेड रस्त्यावरील पूल हा वाहून गेला आहे. या पुलाची उंची कमी असून २००१ तो उभारण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून पुराच्या पाण्याचे धक्के बसलेल्याने या पुलाला आधीच तडे गेले होते. त्याच्या दुरुस्तीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. सरपंच शिवाजी लहाने यांनी मेहकर व देऊळगाव राजा विभागाशी त्यासंदर्भात पत्रव्यवहारही केला होता. 
मात्र, दोन्ही विभागांनी हा पूल आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडे लक्ष वेधले होते. मात्र, आता पूलच मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्याचा एकमेव मार्गच बंद झाला आहे. 
पंचायत समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनीही या पुलासाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे.
राताळी, शिंदी, सवडद, पिंपळगाव सोनारा, साखरखेर्डा, गुंज, वरोडी, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सायाळा, बाळसमुद्र, शेंदुर्जन, तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी केलेली सोयाबीनची पेरणी उलटण्याची भीती व्यक्त होत आहे.

उमनगावचाही संपर्क तुटला
  उमनगावचाही यामुळे संपर्क तुटला आहे. गोरेगाव ते उमनगाव रस्त्यावरील पूल पावसाने क्षतिग्रस्त होऊन त्याचा काही भाग वाहून गेला आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे या नाल्यावरील पूल वाहून गेला होता. गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुरूम टाकून कसाबसा तो वापरण्याजोगा केला होता. १५ दिवसांपूर्वी सरपंच प्रकाश भगत, माजी सरपंच मोहन गायकी, शांताराम गवई, पंजाबराव मोरेंसह ग्रामस्थांनी पुलाचे काम करण्याची मागणी जि. प. बांधकाम विभागाकडे केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. आता उमनगावमध्ये कोणतेच वाहन जाऊ शकत नसल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे.

Web Title: Rainstorm; Two bridges were swept away, and agriculture was damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.