कोरोना दुसऱ्या लाटेची शक्यता, आयडीएसपी सर्व्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 10:59 AM2020-11-16T10:59:38+5:302020-11-16T10:59:45+5:30

Buldhana Corona News संदिग्धांच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे.

The possibility of a second wave of corona, IDSP survey continues | कोरोना दुसऱ्या लाटेची शक्यता, आयडीएसपी सर्व्हेक्षण सुरू

कोरोना दुसऱ्या लाटेची शक्यता, आयडीएसपी सर्व्हेक्षण सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाची राज्यात जानेवारी फेब्रुवारी  महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता आरोग्य विभागाने प्रशासकीय पातळीवर सतर्कता बाळगण्यास प्रारंभ केला असून संदिग्धांच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे.
यासोबतच तापाचे रुग्ण ज्या भागात अधिक सापडत आहे, त्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यासोबच एकात्मिक रोग सर्व्हेक्षण (आयडीएसपी) करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनानुसार  प्रयोगशाळा सुरू ठेवण्यासोबतच दर दहा लाख लोकसंख्येमागे किमान १४० संदिग्धांच्या प्रतीदिन चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त जनसंपर्क अधिक असलेल्या अर्थात छोटे व्यावसायिकांचे गट, घरगुती सेवा पुरविणारे, वाहतूक व्यवसायातील लोक, वेगवेगळी कामे करणारे मजूर यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार कोवीडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी शक्यता पाहता प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे शेकडा प्रमाण किती आहे.
यानुसार सतर्कतेचा िशारा लक्षात घेवून रुग्णोपचार सुविधा वाढविण्यासोबतच कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग सध्या नियोजन करत आहे. दुर्धर आजार असणाऱ्यांनी त्यांचा जनसंर्पक अनलॉक मोहिमेनंतरही मर्यादीत स्वरुपात ठेवावा अशांसाठी कोमॉबिर्डिटी क्लिनिक सुरू करण्यासाबेतच अशा रुग्णांची साप्ताहिक तपासणी उपकेंद्र किंवा वॉर्डनिहाय करण्यासाठी यंत्रणा सक्रीय होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

Web Title: The possibility of a second wave of corona, IDSP survey continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.