पोलिस मित्रांचा खामगावात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:28 PM2020-01-20T14:28:24+5:302020-01-20T14:28:36+5:30

पोलिस मित्रांचा सोमवारी खामगाव शहर पोलिस स्टेशनच्यावतीने  सत्कार करण्यात आला.

Police friends were greeted in Khamgaon | पोलिस मित्रांचा खामगावात सत्कार

पोलिस मित्रांचा खामगावात सत्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्वयंस्फूर्तपणे वाहतूक नियम पाळणाºया आणि पोलिसांना सहकार्य करणाºया पोलिस मित्रांचा सोमवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर होते.
खामगाव शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या दुतर्फा रेषांची आखणी करण्यात आली होती. तसेच पार्कींगलाही शिस्त लागावी म्हणून शहर पोलिसांनी प्रयत्न केले होते. या उपक्रमात स्वयंस्फूर्तपणे सहभागी होत काही व्यावसायिकांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. त्याचप्रमाणे वाहतूक शिस्त आणि नियमांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला होता. अशा पोलिस मित्रांचा सोमवारी खामगाव शहर पोलिस स्टेशनच्यावतीने  सत्कार करण्यात आला. यामध्ये मनिष खेतान, रमेश घोडके, राजकुमार गोयनका, राजेश खिलोशिया,  चेतन वरतानी, महेश गणवानी आदींचा सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Police friends were greeted in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.