‘प्लाझमोडियम’, ‘एडीस’चे प्रमाण घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:12 PM2020-01-10T15:12:31+5:302020-01-10T15:12:50+5:30

गत आठवड्यामध्ये ११ ते १२ अंश सेल्सीयस पर्यंत तापमान घसरल्यामुळे डासांच्या जीवनचक्रात बदल झाला आहे. हवामान बदलामुळे डासांची उत्पत्ती घटली आहे.

Plasmodium aedes mosquito decreases | ‘प्लाझमोडियम’, ‘एडीस’चे प्रमाण घटले!

‘प्लाझमोडियम’, ‘एडीस’चे प्रमाण घटले!

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: वाढत्या थंडीमुळे ‘प्लाझमोडियम’ व ‘एडीस’ चे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारख्या किटकजन्य आजाराचे प्रमाणही आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. गत आठवड्यामध्ये ११ ते १२ अंश सेल्सीयस पर्यंत तापमान घसरल्यामुळे डासांच्या जीवनचक्रात बदल झाला आहे. हवामान बदलामुळे डासांची उत्पत्ती घटली आहे.
गेल्या काही वर्षापासून डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. जेंव्हा डासाचे प्रमाण जास्त असते, तेंव्हा किटकजन्य आजरांचाही प्रादुर्भाव वाढतो. जुलै ते डिसेंबर या काळात डासांचा उपद्रव दिसून येतो. साधारणता: १५ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान आल्यास डांसाचे जीवनचक्रात बाधा निर्माण होते. या वाढत्या थंडीचा परिणाम थेट डासांच्या उत्पत्तीवर दिसून येतो. गेल्या दोन आठवड्यापासून हवामानात बदल झालेला आहे. थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ‘प्लाझमोडीय’, ‘एडीस’ जातीच्या डासाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे किटकजन्य आजार नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या सूक्ष्मपजीवीमुळे हा रोग होतो. मलेरियासोबतच हत्ती रोग, चिकनगुणीया, स्क्रब टायफस व इतर किटकजन्य आजार नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात येतात. परंतू सध्या डासांचे जीवनचक्र बिघडल्याने किटकजन्य आजार अटोक्यात येत आहेत.

महिन्याला दोन ते तीन डेंग्यू रुग्ण

एडिस इजिप्ती जातीच्या डासामार्फत होणारा डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत.महिन्याला दोन ते तीन डेंग्यू रुग्ण आढळून येतात. जिल्ह्यात गतवर्षी २५ ते ३० डेंग्यू सदृश तापेचे रुग्णांची नोंद जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडे झाली आहे. सध्या थंडीमुळे डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाणही अत्यंत कमी झालेले आहे.


मलेरिया २४, चिकनगुणीयाचे २० रुग्ण
४जिल्ह्यात हळुहळू मलेरिया रुग्णांची संख्याही अटोक्यात आली आहे. २००९ मध्ये हाच आकडा ३४८ वर होता; तो आता केवळ २४ वर आला आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे हे मोठे यश आहे. गतवर्षी मलेरियाचे २४ व चिकनगुणीयाचे २० रुग्ण आढळून आले.

वाढत्या थंडीमुळे डांसाची उत्पती कमी झाली आहे. त्यामुळे किटकजन्य अजारांचे प्रमाणही आता कमी झाले आहे. सध्याचे हे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरत आहे.
- शिवराज चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Plasmodium aedes mosquito decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.