‘पार्सल’वरून तहसीलदारांच्या बंगल्यासमोर वाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 12:44 AM2020-02-10T00:44:03+5:302020-02-10T00:44:38+5:30

जिल्हा प्रशासनात खळबळ: जिल्हाधिकाºयांनी मागीतली माहिती

'Parcel' disputes in front of tehsildar's bungalow! | ‘पार्सल’वरून तहसीलदारांच्या बंगल्यासमोर वाद!

‘पार्सल’वरून तहसीलदारांच्या बंगल्यासमोर वाद!

Next

खामगाव: ‘अवैध रेती माफीयांच्या ‘पार्सल’वरून रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तलाठी आणि रेती माफीयांमध्ये वाद झाला. ही घटना तहसीलदारांच्या बंगल्यासमोर घडल्याने खामगावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती बाहेर पसरताच जिल्हाधिकाºयांनीही दखल घेत रात्रीच या प्रकाराची चौकशी केली.


 खामगाव येथील तहसीलदारांच्या बंगल्यासमोर रात्री दोन तलाठी आणि काही रेती माफीया आले. यापैकी एक तलाठी तहसीलदारांच्या बंगल्यात गेला. दरम्यान, बाहेर उभ्या असलेल्या तलाठ्यासोबत रेती माफीयाच्या काही प्रतिनिधींनी वाद घातला. ‘पार्सल’चा हा वाद विकोपाला गेल्यामुळे यावेळी उभयंतामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर तहसीलदारांच्या बंगल्यात असलेल्या तलाठ्याने बाहेर येत, घडलेल्या प्रकाराची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत हा प्रकार जिल्हाधिकाºयांपर्यंत पोहोचला. त्यांनी तातडीने उपजिल्हाधिकाºयांमार्फत घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली  असतानाच, तहसीलदारांच्या बंगल्यासमोर हा दुसºयांदा प्रकार घडल्याचे दिसून येते.

काही दिवसांपूर्वीच तहसीलदारांच्या बंगला आणि कन्या शाळेच्या परिसरात रेती माफीया आणि प्रशासकीय अधिकाºयांमधील वाद विकोपाला गेला होता. त्यावेळी शहर पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. तलाठ्यांचे अवैध रेती माफीयांना पाठबळ असल्यामुळेच वाद आणि राड्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते.
(प्रतिनिधी)

Web Title: 'Parcel' disputes in front of tehsildar's bungalow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.