जिल्ह्यात काेराेनाचे उद्रेक, आणखी ५१७ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:37 AM2021-03-09T04:37:26+5:302021-03-09T04:37:26+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात साेमवारी काेराेनाचा उद्रेक झाला असून एकाच दिवशी तब्बल ५१७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच वरवंड ...

Outbreak of carnage in the district, another 517 positive | जिल्ह्यात काेराेनाचे उद्रेक, आणखी ५१७ पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात काेराेनाचे उद्रेक, आणखी ५१७ पाॅझिटिव्ह

Next

बुलडाणा : जिल्ह्यात साेमवारी काेराेनाचा उद्रेक झाला असून एकाच दिवशी तब्बल ५१७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच वरवंड येथील ६० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच १ हजार ३३४ काेराेना अहवाल निगेटिव्ह असून ३१४ जणांनी काेराेनावर मात केली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर, पळसखेड भट येथील प्रत्येकी एक, सुंदरखेड २, कळमखेड १, वरवंड ३, गिरडा २, येळगांव १, शिरपूर २, करडी १, पिं. सराई १, चांडोळ १, बुलडाणा शहर ७८, चिखली शहर ८९, चिखली तालुका खैरव ४, बोरगांव वसु २, अमडापूर ३, गोदरी १, मालखेड १, पिंपळगांव १, भालगांव २, कोळेगांव १, पेठ १, धोत्रा नाईक २, बेराळा १, केळवद ३, सवणा ५, सोनेवाडी १, भानखेड १, किन्होळा १, पळसखेड जयंती ३, वळती १, दरेगांव १, मेरा बु ३, अंबाशी १, मेरा खु २, रायपूर १, मेहकर शहर ८, मेहकर तालुका सायळा ५, गोमेधर १, दुधा २, जानेफळ २, देऊळगांव साकर्शा १, थार ७, मोताळा शहर २, मोताळा तालुका पोफळी १, तरोडा १, शेलापूर १, डिडोळा १, सिंदखेड लपाली २, मलकापूर शहर ५४, मलकापूर तालुका माकनेर १, दुधलगांव २, दाताळा २, लोणवडी १, निंबारी १, भाडगणी १, मोरखेड ३, जांभुळधाबा २, खामगांव शहर ४०, खामगांव तालुका सुटाळा खु ४, सुटाळा बु १, पिंप्राळा १, घाटपुरी १, शेगांव शहर २२, शेगांव तालुका सगोडा १, हिंगणा १, पहुरजिरा १, संग्रामपूर तालुका पातुर्डा २, वरवट बकाल १, जळगांव जामोद शहर ७, जळगांव जामोद तालुका आसलगांव २, वडशिंगी २, सुनगांव १, लोणार शहर ४, लोणार तालुका पिंपळनेर ४, गोत्रा ४, पांगरा दराडे १०, हिरडव २४,मांडवा २, रायगांव १,किनगांव जट्टू १, वडगांव तेजन ५, देऊळगांव ३, दे. राजा शहर ७, दे. राजा तालुका : धानोरा १, सिनगांव जहा ३, उमरद १, अंढेरा १, सिं. राजा शहर ३, सिं. राजा तालुका साखरखेर्डा ६, खैरखेड १, आडगांव राजा ३, माळ सावरगांव ३, नांदुरा शहर ३, नांदुरा तालुका धानोरा १, विटाळी १, शेंबा १, मूळ पत्ता जाळीचा देव जि. जालना ४, पिंपळफाटा ता. जाफ्राबाद जि. जालना १, मालेगांव जि वाशिम २, वालसावंगी जि. जालना ४, वाकड पुणे १, संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.

२०१ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात आज अखेर एकूण २१ हजार ८२१ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १८ हजार ७७६ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात २ हजार ८४४ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २०१ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Outbreak of carnage in the district, another 517 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.