आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले; भाजीपाल्याचे काेसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 04:55 PM2020-11-23T16:55:14+5:302020-11-23T16:55:19+5:30

Onion prices rise जुन्या कांद्याचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले.

Onion prices rise as incomes declined; The vegetables prised slashed | आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले; भाजीपाल्याचे काेसळले

आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले; भाजीपाल्याचे काेसळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी पाउस झाल्याने बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे, भाव पुन्हा ७० ते ८० रुपयांवर गेले आहे. खाद्य तेलाचे भाव दिवाळीपासून वाढतच असल्याचे चित्र आहे. फळांची आवक वाढल्याने भाव काेसळले आहेत. 
  पावसामुळे नविन कांदा शहरात आलाच नाही. त्यामुळे, जुन्या कांद्याचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले. रविवारी बाजारात ७० ते ८० रुपये प्रती किलाेप्रमाणे विकल्या गेला. बाजारात माेठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढली आहे.  त्यामुळे,  गाेबी,  वांगे,  टाेमॅटाे,  काकडी,  काेथींबीर,  भेंडी कारले आदीचे भाव काेसळले आहेत. भाजीपाल्याचे भाव कमी झाले असले तरी, इतर किराणा साहित्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसला आहे.

सफरचंद ७० ते ८० रुपयांवर 
गत आठवड्यात सफरचंद १०० रुपये किलाेप्रमाणे सफरचंद विकल्या जात हाेते. या आठवड्यात सर्वच फळांचे भाव माेठ्या प्रमाणात काेसळले आहेत. सफरचंद ७० ते ९० रुपयांवर तर संत्रा २०, बाेर २०, अनार २० ते ३०, पायनापल ६० रुपये किलाेप्रमाणे विकल्या जात आहे.   बाजारात संत्रा,अनार, पायनापल आदींची आवक माेठ्या प्रमाणात वाढली आहे.फळ बाजारात या आठवड्यात मंदी असल्याचे चित्र आहे. 


दिवाळीनंतर फळांच्या बाजारात मंदी आली आहे. सफरचंद, संत्रा, बाेर, अनार आदींचे भाव माेठ्या प्रमाणात काेसळले आहेत. 
-अहमद बागवान,  फळविक्रेता
 

Web Title: Onion prices rise as incomes declined; The vegetables prised slashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.