चोरीच्या संशयावरून एकास झाडाला बांधून चोपले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:53 AM2020-06-02T11:53:10+5:302020-06-02T11:54:50+5:30

आपण चोरी नाही केल्याचे सांगितल्यानंतरही चौकसे कडून एका त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली.

One was tied to a tree and beaten on suspicion of theft! | चोरीच्या संशयावरून एकास झाडाला बांधून चोपले!

चोरीच्या संशयावरून एकास झाडाला बांधून चोपले!

googlenewsNext
ठळक मुद्देही घटना सोमवारी दुपारी घडली. पोलिस चौकीतील कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते. त्यामुळे सायकल स्टॅन्ड संचालकाने कायदा हातात घेतला.

खामगाव: येथील बसस्थानकातील सायकल स्टॅन्डच्या संचालकाला चोरीच्या संशयावरून झाडाला बांधून चोपले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. घटना घडली त्यावेळी बसस्थानक पोलिस चौकीतील कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते. त्यामुळे सायकल स्टॅन्ड संचालकाने कायदा हातात घेतला.
बसस्थानक परिसरात असलेल्या चौकसे यांच्या सायकल- दुचाकी स्टॅन्डवर काही दिवसांपासून भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी दुपारी कैलास वाघ नामक एक व्यक्ती बसस्थानकात फिरत होता. त्यावेळी सायकल आणि दुचाकी स्टॅन्डवर चोरी झाल्याने संबंधित व्यक्तीला पकडून बसस्थानक आवारातील एका झाडाला बांधले. इतकेच नव्हे तर गुन्ह्याची कबुली देई पर्यंत त्या व्यक्तीस पोलिसांप्रमाणे रिमांड घेतला. आपण चोरी नाही केल्याचे सांगितल्यानंतरही चौकसे कडून एका त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर चौकसेने बसस्थानक चौकीतील पोलिस येईपर्यंत त्या व्यक्तीला बसून ठेवले. सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान, बसस्थान चौकीत कर्तव्यावर असलेले पोलिस घटनास्थळी पोहोचले.

Web Title: One was tied to a tree and beaten on suspicion of theft!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.