१७ दिवसानंतरही ठिबक सिंचन घोटाळ््याच्या चौकशीस सुरवात नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:04 PM2020-01-28T15:04:54+5:302020-01-28T15:05:04+5:30

कोट्यवधी रुपयांचे बोगस अनुदान लाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून उघड केला.

No inquiry into drip irrigation scam even after 17 days! | १७ दिवसानंतरही ठिबक सिंचन घोटाळ््याच्या चौकशीस सुरवात नाही!

१७ दिवसानंतरही ठिबक सिंचन घोटाळ््याच्या चौकशीस सुरवात नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेतील घोटाळ््याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी चौकशी नेमली. मात्र चौकशी करण्याची जबाबदारी सोपवलेल्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडूनच २० दिवस उलटले तरी अद्याप एकाही गावातील सिंचन घोटाळ््याची चौकशी करण्याचे धाडस दाखवले नसल्याचे दिसून येते. यामुळे ठिबस सिंचन घोटाळ््याच्या चौकशीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, परवानाधारक ठिबक विक्रेते व शेतकरी यांच्या संगनमतातून कोट्यवधी रुपयांचे बोगस अनुदान लाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून उघड केला. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ डिसेंबररोजी कृषी अधिकारी सी.एन.पाटील यांना ठिबक संच भेट देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. आठवडाभरात चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी चौकशी पथक नेमले. १० जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश बुलडाणा, मेहकर व खामगावच्या उपविभागीय कृषी अधिकाºयांना दिले.
१७ दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप एकाही उपविभागीय कृषी अधिकाºयाने चौकशी पूर्ण करून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाºयांना अहवाल सादर केलेला नाही. यामुळे उपविभागीय कृषी अधिकाºयांच्या भूमिकेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शंका उपस्थित केली आहे. (प्रतिनिधी)

ठिबक सिंचन घोटाळ््याची चौकशी कामांच्या व्यस्ततेमुळे सुरू करण्यात व्यत्यय आला आहे. लवकरच चौकशी पूर्ण करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल.
- दिपक पटेल, उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव

ठिबक सिंचन घोटाळ््याची चौकशी कामांच्या व्यस्ततेमुळे सुरू करण्यात व्यत्यय आला आहे. लवकरच चौकशी पूर्ण करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल.
- श्री. देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर


शेतकºयांचे हित लक्षात घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. प्रकरणाची चौकशी आठवडाभरात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू याची दखल अधिकाºयांनी घ्यावी.
- मोहन पाटील, संपर्क प्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: No inquiry into drip irrigation scam even after 17 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.