ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याला चालना      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:07 PM2019-08-30T17:07:04+5:302019-08-30T17:07:08+5:30

 कंपोस्ट खत निर्मितीला व वापराला नगर विकास विभागाकडून चालना  देण्यात येत आहे.

Motivation to make compost from wet waste | ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याला चालना      

ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याला चालना      

Next

बुलडाणा: ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीला व वापराला नगर विकास विभागाकडून चालना  देण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करून कचरामुक्त मानांकनात तीन तारांकित मानांकन प्राप्त करणाºया शहरांना १ जानेवारी २०२० पासून प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे ओल्या कचºयापासून खत तयार करण्याच्या अनुषंगाने पालिकास्तरावर हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. 
शहरी भागामध्ये घनकचºयाचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी मिशन मोड पद्धतीने सुरू आहे. राज्यातील शहरी भाग हगणदरीमुक्त केल्यानंतर आता घनकचºयाचे व्यवस्थापन करून शहरे स्वच्छ करण्याचा उपक्रम नगर विकास विभागाने हाती घेतला आहे. यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे, हा घनकचरा व्यवस्थापनाचा मुख्य भाग आहे. यापूर्वी बहुतांश शहरांमध्ये घनकचºयावर प्रक्रिया न करता तो डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत होता. राज्यामध्ये विविध शहरांमध्ये घनकचरा साठवणीमुळे विविध समस्या निर्माण होत होत्या. या समस्यांवर मात करण्यासाठी शहरामध्ये निर्माण होणाºया घनकचºयाचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करणे, वेगळ्या केलेल्या घनकचºयापैकी विघटनशील (ओल्या) कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे आवश्यक आहे. शहरांमधील विलगीकृत विघटनशील घनकचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यास नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन मिळावे, शेतकºयांमार्फत या सेंद्रीय खताचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हावा, यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना १ हजार ५०० रुपये प्रति मेट्रिक टन किंवा शासन ठरवेल एवढे प्रोत्साहन अनुदान निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार देण्यात येईल. ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची अंमलबजावणी करून कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनात तीन तारांकित मानांकन प्राप्त करतील अशा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना १ जानेवारीपासून शासनामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान प्राधान्याने देण्यात येणार आहेत. यामुळे पालिकास्तरावर सध्या घनचकरा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्यात आले असून त्यानुसार नियोजन करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. 


कचऱ्यावरील शास्त्रोक्त प्रक्रियेला मिळणार विस्तृत रुप
जिल्ह्यातील सर्वच नगर पालिका ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करतात. त्यानंतर बहुतांश पालिकांकडून वेगळ्या केलेल्या घनकचºयापैकी विघटनशील कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येते. मात्र आता ओल्या कचºयापासून खत तयार करणाºया शहरांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असल्याने पालिकांकडून कचºयावरील शास्त्रोक्त प्रक्रियेला विस्तृत रुप दिले जाणार असल्याची माहिती काही पालिकेच्या मुख्याधिकाºयांनी दिली आहे. 


ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यात येत आहे. मेहकर शहराची ओल्या कचºयापासून खत निर्मिती पुर्वीपासूनच सुरू आहे. सध्या खताचे प्रमाण कमी आहे. त्याला आता विस्तृत रुप देण्यात येणार असून, १०० टक्के खत निर्मितीचा प्रयत्न राहिल. 
-सचिन गाडे, मुख्याधिकारी, नगर पालिका, मेहकर.

Web Title: Motivation to make compost from wet waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.