Mathrithi Sindhhed King Nagri ready for the Jijau Janmotsav | जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरी सज्ज
जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरी सज्ज

ठळक मुद्देराजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवर करण्यात आली आहे रोषणाई महापुजेचे आयोजन 

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा :  शुक्रवारी होत असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेड  राजा नगरी सज्ज झाली असून, अनेक जिजाऊ भक्तांचे पाय आता मातृतीर्थाकडे वळू  लागले आहेत. त्यानुषंगाने सिंदखेड राजातील राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवरही  रोषणाई करण्यात आली आहे.
१२ जानेवारीला सकाळी सूर्याेदयी राजे लखुजीराव जाधव यांच्या वाड्यातील जिजाऊ जन्मोत्सव स्थळी महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संघटना,  राजकीय, शासकीय अधिकारी यांच्यावतीनेसुद्धा महापुजेचे आयोजन येथे केले आहे.  सूर्योदयापासूनच महापुजेनंतर मॉ जिजाऊंच्या दर्शनासाठी येथे रांगा लागतात. जागोजागी  सुरक्षा कठडे, राजवाडा परिसरात टेहाळणी कॅमेरे, वाहनतळ, तसेच जिजाऊ सृष्टीच्या  परिसरात मंडप दुकानाची व्यवस्था, रंगरंगोटी करून मातृतीर्थ नगरी जिजाऊ जन्मो त्सवासाठी सज्ज आहे. 


Web Title: Mathrithi Sindhhed King Nagri ready for the Jijau Janmotsav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.