मलकापूरः  वीजपुरवठा बंद असल्याने शेतकरी संतप्त; महावितरण कार्यलयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:38 PM2020-02-18T14:38:23+5:302020-02-18T14:38:30+5:30

पिकांचे नुकसान होत असल्याने आज मंगळवारी सकाळी १०.३० वीजकंपनीच्या एमआयडीसी कार्यालयात राडा घातल्याची घातला

Malkapur: Farmers angry because electricity supply is shut down; Vandalism at Msedcl Office | मलकापूरः  वीजपुरवठा बंद असल्याने शेतकरी संतप्त; महावितरण कार्यलयात तोडफोड

मलकापूरः  वीजपुरवठा बंद असल्याने शेतकरी संतप्त; महावितरण कार्यलयात तोडफोड

googlenewsNext

मलकापूरः आठदिवसापासून वीजपुरवठा बंद असल्याने मलकापूर तालुक्यातील पाच गावातील संतप्त शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान होत असल्याने आज मंगळवारी सकाळी १०.३० वीजकंपनीच्या एमआयडीसी कार्यालयात राडा घातल्याची घातला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे यांच्या मध्यस्थीने शेतकरी शांत झाले.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,तालुक्यातील वाघोळा,चिंचोल,कोरवाड,दुधलगांव,ददसरखेड अशा पाच गावात विजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना गहू, हरबरा या पिकांची वाढ करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवात संतप्त भावना आहेत.
आज सकाळी संतप्त शेतकरी सरपंच संघटना अध्यक्ष रामराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीजकंपनीच्या मलकापूर एमआयडीसी कार्यालयात दाखल झाले.त्यांनी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोटपोट,शिवीगाळ करीत तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, विजकंपनीचे कार्यकारी अभियंता साळी,उपविभागीय अभियंता अनिल शेगावकर,अभियंता चौधरी हे देखील दाखल झाले.
संतप्त शेतकरी व वीजकंपनीचे  अधिकारी व कर्मचारी यांच्यात संतोषराव रायपूरे यांनी मध्यस्थी केली.पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी संवाद साधून त्यांनी ३५ पोलचा विषय डिपीडीसी च्या माध्यमातून सोडविण्यासंबंधी आश्चस्त  करून वाद संपुष्टात आणला. 
त्यानंतर  विनोद कारंजकर ,गणेश सपकाळ, रमेश जैस्वाल, निलेश अहीर,मंगेश टाकरखेडे,नितीन पाचपोर,विलास कांडेलकर,योगेश चोपडे, मोहन गावंडे,आदीसह संतप्त शेतकरी शांत झाले. दरम्यान एमआयडीसी पोलिसही घटनास्थळी दाखल झाली होती.

Web Title: Malkapur: Farmers angry because electricity supply is shut down; Vandalism at Msedcl Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.