Maharashtra Election Voting Live : Elections 'craze' in new voters | Maharashtra Election Voting Live : नव मतदारांमध्ये मतदानाची ‘क्रेझ’!
Maharashtra Election Voting Live : नव मतदारांमध्ये मतदानाची ‘क्रेझ’!

- अनिल गवई

खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी गुरूवारी दुसºया टप्प्यात मतदान होत आहे. लोकशाहीच्या या लोकोत्सवात बुलडाणा मतदार संघात ३४ हजाराच्या जवळपास नव मतदार आहेत. पहिल्यादांच मतदानाचा हक्क बजावणाºया या मतदारांमध्ये गुरूवारी मतदानाबाबत कमालिची उत्सुकता दिसून आली.

बुलडाणा लोकसभा मतदार संघात ३४ हजार ३३८ नव मतदार (१८-१९) वयोगटातील मतदारांची संख्या आहे. यामध्ये २२ हजार १४६ पुरूष तर १२ हजार २२२ महिला मतदारांची संख्या आहे. तर खामगाव विधानसभा मतदार संघात (१८-१९) या वयोगटातील मतदारांची संख्या ५ हजार ५९७ इतकी आहे. यामध्ये ३ हजार ७२१ पुरूष आणि १८७६ महिला मतदारांची संख्या आहे. त्याचप्रमाणे सुमारे चार लाखाच्या जवळपास (२०-२९) या वयोगटातील आहे. यापैकी बहुतांश मतदार लोकसभेसाठी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत आहेत.  नव मतदारांमध्ये मतदानासाठी कमालिची उत्स्कुता दिसून आली. मतदान प्रक्रीयेसंदर्भात ते वरिष्ठ आणि मित्रमंडळीकडून जाणून घेत होते. त्याचवेळी काही जणांनी सोशल मिडीयाचा आधार घेत मतदान केले. पहीलेच मतदान असल्याने मतदान प्रक्रीयेविषयी थोडी धास्ती असल्याची कबुलीही काही अतिशय प्रामाणिक पणे दिली.

‘व्हीव्हीपॅट’ संदर्भात अनेकजण अनभीज्ञ!

मतदान प्रक्रीयेच्या पारदर्शकतेसाठी यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा बुलडाणा लोकसभा मतदार संघात वापर करण्यात आला. मात्र, नवमतदारांमध्ये या मशीनविषयी आकर्षण होते. मात्र, मतदान प्रक्रीयेदरम्यान मनात उडालेल्या गोंधळामुळे मतदान कुणाला केले. याची खात्री पटवू शकले नाही. मात्र, योग्य ते बटन दाबत, पहिल्यांदाच यशस्वी मतदान केल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रीया अनेकांनी नोंदविली.

 

असे आहेत नव मतदार!

मतदार संघ    पुरूष    महिला    एकुण

बुलडाणा    ३६४७    २३०६    ५९४३

चिखली    ३६६१    २१८५    ५८४६

सि.राजा    ३६१०    १९०४    ५५१४

मेहकर        ३५७९    १८७०    ५४४९

खामगाव    ३७२१    १८७६    ५५९७

जळगाव जामोद    ३९२८    २०८१    ६००९


पहिल्यादांच मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रीयेविषयी सुरूवातीला थोडी धाकधूक होती. मात्र, निर्भिडपणे मतदान केल्याचे समाधान आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केल्याचा अभिमान आहे.

- सोनम अमोल तायडे, नवमतदार, खामगाव.


Web Title: Maharashtra Election Voting Live : Elections 'craze' in new voters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.