कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला, म्हणून ॲप डाऊनलाेड करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:39+5:302021-07-27T04:36:39+5:30

बुलडाणा : गृहकर्जासह, व्यावसायिक कर्ज आणि आपण ऑनलाइन सर्च केलेल्या विविध वेबसाइवर आपले प्राेफाइल जाताच संबंधित कंपन्यांकडून, तसेच ऑनलाइन ...

A low percentage loan message came, so don't download the app! | कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला, म्हणून ॲप डाऊनलाेड करू नका!

कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला, म्हणून ॲप डाऊनलाेड करू नका!

Next

बुलडाणा : गृहकर्जासह, व्यावसायिक कर्ज आणि आपण ऑनलाइन सर्च केलेल्या विविध वेबसाइवर आपले प्राेफाइल जाताच संबंधित कंपन्यांकडून, तसेच ऑनलाइन चाेरट्यांकडून तशा प्रकारचे ॲप डाऊनलाेड करण्यासाठी विविध लिंक, तसेच ॲपची माहिती आपाेआपच तुमच्या माेबाइलवर देण्यात येते. अत्यंत कमी व्याजदर आणि नाे प्राेसेसिंग चार्जेस अशा प्रकारचे आमिष दाखवून, तुमची संपूर्ण माहिती गाेळा करून, तुमच्याच बँक खात्यातील रक्कम साफ करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे ॲप डाऊनलाेड करताना सावधानी बाळगणे गरजेचे असल्याची माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली आहे.

काेराेनाचे संकट प्रचंड वाढल्यानंतर, प्रत्येकाचा ऑनलाइनकडे कल वाढला आहे. अनेक जण बँकिंग व्यवहारही आता ऑनलाइन पद्धतीने करीत आहेत. ऑनलाइन व्यवहार सुरक्षित असले, तरी आता हॅकर्सनी नवीन फंडा शाेधत तुम्हीच सर्च केलेल्या विविध वेबसाइटच्या माध्यमातून कमी टक्क्याचे व्याजदर आकारण्यात येत असलेले कर्ज देण्याचे, तसेच विविध आमिष देऊन तुमच्या बँक खात्यातील रक्कम पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. चिखलीतील एका व्यापाऱ्याची जवळपास तीन लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली़ कस्टमर केअरचा क्रमांक सर्च करणे या व्यापाऱ्यास चांगलेच महागात पडले.

ॲप डाऊनलाेड करताच बँक खाते साफ

कमी मेगाबाइट्स असलेले विविध ॲप हे बनावट असतात. तुम्ही एखादे ओरिजिनल ॲप डाऊनलाेड करीत असताना, तशाच प्रकारचे बनावट ॲप तुमच्या वाॅलवर येईल. तुम्ही हे बनावट ॲप डाऊनलाेड करताच, तुमची संपूर्ण माहिती समाेरील व्यक्तीला जाईल आणि ताे तुमच्या बँक खात्यातील रक्कम साफ करेल. त्यामुळे संबंधित बँक, तसेच फायनान्स कंपनीचे अधिकृत ॲपच डाऊनलाेड करावे, अन्यथा तुमची फसवणूक निश्चित हाेईल़

या आमिषांपासून सावधान

अत्यंत कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, एका तासात कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्याचे आमिष देण्यात येते.

आजच अर्ज आजच कर्ज अशा प्रकारच्या फायनान्स कंपन्यांच्या याेजना असल्याचे सांगून फसविण्याचा नवीन फंडा सध्या सुरू आहे.

यांच्याप्रमाणे तुम्हीही फसू शकता

केस क्र १

ऑनलाइन व्यवहारात अडचणी आल्याने, चिखलीतील एका व्यापाऱ्याने कस्टमर केअरचा क्रमांक सर्च केला. या क्रमांकावरून समाेरून बाेलत असलेल्या सायबर गुन्हेगाराने व्यापाऱ्याकडून बॅंक खात्याची माहिती घेतली, तसेच जवळपास तीन लाख रुपयांची फसवणूक केली. शेगाव येथील एका विद्यार्थ्यांलाही गुगलवर कस्टमर केअर क्रमांक सर्च करणे महागात पडले.

केस क्र २

माेताळा तालुक्यातील आडविहिरी येथील एकाने पुणे येथे जाण्यासाठी खासगी बसचे तिकीट ऑनलाइन बुक केले हाेते. हे तिकीट रद्द करण्यासाठी त्यांनी ट्रॅव्हल्स एजन्सीचा नंबर शोधून फोन केला. त्यांना परत फाेन आला व तिकीट रद्द करायचे असेल, तर सविस्तर माहिती द्या़, तसेच पैसे खात्यात टाकायचे असल्याने, एनिडेस्क ॲप डाऊनलोड करायचे सांगितले. ॲप डाऊनलोड करताच अवघ्या २० मिनिटांत त्यांच्या खात्यातील ६ लाख ६ हजार रुपये लंपास केले. यातील आराेपीस नुकतेच सायबर सेलने गुजरात येथून अटक केली.

एनी डेस्कसारखे ॲप चुकूनही डाऊनलाेड करू नका. केवायसी किंवा विविध आमिष दाखवून तुम्हाला बॅंक खात्याची माहिती मागितली, तर देऊ नका. सध्या ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, फसवणूक झाल्यास तत्काळ पाेलीस ठाण्यात तक्रार करावी.

प्रदीप ठाकूर, पाेलीस निरीक्षक, सायबर सेल, बुलडाणा

Web Title: A low percentage loan message came, so don't download the app!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.