खामगावातील ‘खेल का मैदान’  ्रपरिसराचा क्लस्टर कंटेन्मेटझोनमध्ये समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 06:21 PM2020-05-17T18:21:49+5:302020-05-17T18:22:02+5:30

प्रशासनाने संबंधित परिसराचा क्लस्टर कंटेन्मेटझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Khamgaon's 'Khel Ka Maidan' premises included in cluster containment zone! | खामगावातील ‘खेल का मैदान’  ्रपरिसराचा क्लस्टर कंटेन्मेटझोनमध्ये समावेश!

खामगावातील ‘खेल का मैदान’  ्रपरिसराचा क्लस्टर कंटेन्मेटझोनमध्ये समावेश!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  येथील  समन्वय नगर- २ , ‘खेल का मैदान’ परिसरातील एक महिला रविवारी रात्री कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली असून, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने संबंधित परिसराचा क्लस्टर कंटेन्मेटझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोरोना मुक्त जिल्हा म्हणून बुलडाणा जिल्ह्याचे स्वप्नं भंगल्यानंतर जिल्ह्यात तब्बल पाच जण कोरोना संक्रमीत आढळून आले आहे. दरम्यान, रविवारपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या खामगाव शहरालाही आता ‘कोरोना’ची लागण झाल्याचे चित्र आहे. खामगाव शहरातील जिया कॉलनी, खेल का मैदान परिसरात एक कोरोना संक्रमित महिला आढळून आल्याने खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव शहरातील खेल का मैदानाचे पूर्वेकडील मेनगेट हनुमान मंदिर, राजेंद्र मस्के यांच्या घरासमोरील परिसिर, गुलजम्मा शाह यांच्या घरासमोरील चौक आणि खेल मैदानाजवळील दक्षिणेकडील गेट पूर्णपणे सील करण्यात आले आहे. नगर पालिका प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात निर्जुंतुकीरण द्रावणाची फवारणी करण्यात आली आहे.

 
दूध, भाजीवाल्यांकडून सील तोडण्याचा प्रयत्न!
्रेल्वे गेटवरून झिया कॉलनीकडे जाणाºया रस्त्यावर पोलिस आणि महसूल प्रशासनाने जाणारे रस्ते सील केले आहेत. या रस्त्यांवरील सील तोडून परिसरात रविवारी सकाळी काही दूध विक्रेते आणि भाजी पाला विक्रेत्यांनी प्रयत्न केला. त्यांना स्थानिकांकडून रोखण्यात आले. याठिकाणी प्रशासकीय कर्मचारी हजर नसल्याने, अनेकांनी परिसरात जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

 
खामगाव, शेगावात कलम १४४ लागू!
खामगाव येथे मुंबई येथून आलेली  एक महिला आणि शेगाव येथील एक सफाई कामगार कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर रविवारी शेगाव आणि खामगाव शहरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.
 

Web Title: Khamgaon's 'Khel Ka Maidan' premises included in cluster containment zone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.