खामगावात बाहेर फिरणाऱ्यांची धरपकड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:14 PM2020-03-30T12:14:09+5:302020-03-30T12:14:54+5:30

शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Khamgaon :Police take action against persons wandering in lockdown | खामगावात बाहेर फिरणाऱ्यांची धरपकड!

खामगावात बाहेर फिरणाऱ्यांची धरपकड!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संचारबंदीत विनाकारण फिरणाºया ५ जणांविरोधात शहर पोलिसांनी भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाºया १८ जणांची धरपकड करण्यात आली. शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार २३ मार्चपासून खामगाव शहरात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, तरी देखील काहीजण लॉकडाऊन तोडत विनाकारण बाहेर पडताहेत. बाहेर पडणाºया नागरिकांना यापूर्वीच पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला आहे. मात्र, तरी देखील अनेकांच्या ही बाब पचनी पडत नसल्याने, रविवारी शहर पोलिसांनी बाहेर फिरणाºयांची धरपकड सुरू केली. त्यानंतर भादंवि कलम १८८ अन्वये चार गुन्ह्यांमध्ये ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन जणांवर स्वतंत्र तर दोन जणांवर एकत्र गुन्हा दाखल केला आहे.


काय आहे कलम १८८ !
भादंवि कलम १८८ दखलपात्र/ जामिनपात्र गुन्हा असून यामध्ये आदेशाची अवज्ञा केल्यास १ महिना कैद आणि १०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.  जर आदेशाचीअवज्ञा झाल्याने मानवी जीवन धोक्यात आले तर ०६ महिने कैद व १००० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.


गर्दी करणाºयांना पोलिसांचा प्रसाद!
शहरातील खुली मैदान आणि खुल्या परिसरात गर्दी करणाºयांना रविवारी पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. दाटवस्तीतील एका ठिकाण पत्ते खेळणाºया टारगटांनाही पोलिसांनी लक्ष्य केले.


संचारबंदीत विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. वारंवार सांगूनही पोलिसांना सहकार्य न करणाºया ५ जणांविरोधात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
- सुनिल अंबुलकर शहर पोलिस निरिक्षक, खामगाव.

Web Title: Khamgaon :Police take action against persons wandering in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.