#खामगाव कृषी महोत्सव : गटशेतीतून लाखोंची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:53 AM2018-02-20T01:53:44+5:302018-02-20T01:54:47+5:30

खामगाव: नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे शेती  फायद्याची की तोट्याची, याची नेहमीच चर्चा होते; परंतु काही शेतकरी संकटावर  मात करून सकारात्मकतेने आधुनिक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी  खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत. वसंत बळीराम पाटील त्यापैकीच एक शे तकरी. त्यांनी गावातील २२ शेतकर्‍यांना संघटित करून गटशेतीचा प्रयोग सुरू  केला आणि पाहता-पाहता गटशेतीचे उत्पन्न ३५-४0 लाखांपर्यंत पोहोचविले. 

Khamgaon Krishi Mahotsav: Millions of turnover turnover from group! | #खामगाव कृषी महोत्सव : गटशेतीतून लाखोंची उलाढाल!

#खामगाव कृषी महोत्सव : गटशेतीतून लाखोंची उलाढाल!

Next
ठळक मुद्देशेतमाल थेट ग्राहकांपर्यंत सेंद्रिय शेती, बीजोत्पादन करून उन्नती

नितीन गव्हाळे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे शेती  फायद्याची की तोट्याची, याची नेहमीच चर्चा होते; परंतु काही शेतकरी संकटावर  मात करून सकारात्मकतेने आधुनिक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी  खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत. वसंत बळीराम पाटील त्यापैकीच एक शेतकरी. त्यांनी गावातील २२ शेतकर्‍यांना संघटित करून गटशेतीचा प्रयोग सुरू  केला आणि पाहता-पाहता गटशेतीचे उत्पन्न ३५-४0 लाखांपर्यंत पोहोचविले. 
नांदुरा तालुक्यातील वडी गावचे राहणारे वसंत पाटील यांच्याकडे १५ एकर शेती.   सततची नापिकी, रासायनिक खतांचा वापर, कमी उत्पन्न यामुळे पाटील वैतागले.  त्यांनी शेतामध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली. कमी खर्चामध्ये आणि त्यात  सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करीत, त्यांनी शेतात कडधान्ये, मिश्र पिके,  रब्बी पिके घेण्यास सुरुवात केली आणि विषमुक्त शेतामालावर प्रक्रिया करून  त्यांनी हा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला. शेतमालाला मिळणारा अल्प  मोबदला, ऑनलाइन नोंदणीच्या प्रश्नातून त्यांनी स्वत:ची सुटका तर केलीच,  शिवाय गावातील २२ शेतकर्‍यांना एकत्र करून जय श्रीराम सेंद्रिय शेतकरी  स्वयंसहायता गट २0१६ मध्ये सुरू केला आणि १00 एकराची गटशेती  करण्यास सुरुवात केली. गटाचे अध्यक्ष गणेश घाटे पाटील, गटप्रमुख वसंत  पाटील यांनी शेतातील माल व्यापार्‍याकडे न देता, त्यांनी शेतकर्‍यांनाच उत्पादक ते  विक्रेता बनविले. राज्यभरातील अनेक शहरामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शे तामालाची थेट विक्री होते. तूर, उडीद, मूग, तीळ, चना डाळ,  गूळ, गहू,  ज्वारीची विक्री करून दुप्पट नफा कमावितात.  १00 एकरातून  जय श्रीराम  सेंद्रिय शेतकरी स्वयंसहायता गटातील शेतकरी दरवर्षी ३५-४0 लाख रुपयांचे उत् पन्न मिळवितात.  त्यांनी केलेला गटशेतीचा प्रयोग विदर्भातील शेतकर्‍यांना कृषी  विकासाची दिशा देणारा आहे. 

कृषी अवजारे बँकेची निर्मिती
कृषी महोत्सवामचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी  अवजारे बँकेस प्रोत्साहन देण्याचा शासनाचा विचार असल्याचे मत व्यक्त केले  होते; परंतु त्यापूर्वीच बुलडाणा तालुक्यातील सावळी व चांडोळ सर्कलमधील  सहा गावांमधील २९0 शेतकर्‍यांनी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत  चांडोळ फार्मस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. शेतकर्‍यांना बाजारपेठ मिळवून  देणे, उत्पादन खर्च कमी करणे, आधुनिक शेती, शेतमालाची प्रक्रिया करणे  आणि सेंद्रिय शेती करून बीजोत्पादन करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर  या शेतकर्‍यांनी सामूहिक तत्त्वावर कृषी अवजारे बँक सुरू केली. या बँकेच्या  माध्यमातून शेतकर्‍यांना शेती मशागतीसाठी, शेतमाल प्रक्रियेसाठी यंत्र, शेती  अवजारे अल्प दरात उपलब्ध करण्यात येतात. 

Web Title: Khamgaon Krishi Mahotsav: Millions of turnover turnover from group!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.