कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 11:53 AM2021-03-14T11:53:01+5:302021-03-14T11:53:09+5:30

Crop Loan News जिल्ह्यातील १४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Increased crop debt to borrowers who submit loan on time | कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज

कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्यावर्षी उद्दिष्टांपेक्षा १६ टक्के अधिक पीककर्ज वाटप करणाऱ्या जिल्हा बँकेने आगामी आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटपाची भूमिका घेतली असून त्यासाठी चालू आर्थिक वर्षातील थकित पीककर्ज ३१ मार्चच्या आत भरल्यास अशा शेतकऱ्यांना वाढीव पीककर्जदराने पीककर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा बँकेने हालचाली सुरू केल्या आहेत. याचा जिल्ह्यातील १४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेला गेल्या पाच वर्षांपूर्वी केंद्र, राज्य शासन आणि नाबार्डने मदत केल्यानंतर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली होत आहे. त्यातच बँकेमध्ये गुंतवणूकही झाली असून बँकेने शेअर्सद्वारा भांडवल उभारणीस प्रारंभ केला आहे. परिणामस्वरूप सुरक्षित कर्जवाटपास जिल्हा बँकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रारंभ केला आहे. बँकेचे सीआरएआरचे प्रमाणही आता १७ टक्क्यांवर पोहोचले आहे. 
त्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी जिल्हा बँकेच्या ७० शाखांद्वारे ७२ कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप केले होते. अग्रणी बँकेने ६२ कोटींचे उद्दिष्ट दिले असता जिल्हा बँकेने ७२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. एकूण उद्दिष्टांच्या १६ टक्के अधिक पीककर्ज बँकेने वाटप केले आहे. त्यानुषंगाने जिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीककर्जाचा ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी भरणा केल्यास त्यांना जिल्हा बँक वाढीव पीककर्जदराने नवीन कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी सांगितले. गेल्यावर्षी ४७ ग्रामीण शाखा आणि २३ सेमी अर्बन भागातील शाखांद्वारे जिल्हा बँकेने हे पीककर्ज वाटप केले होते. परिणामी आगामी आर्थिक वर्षात जिल्हा बँक शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज देण्याच्या दृष्टीने हालचाली करत आहे.

Web Title: Increased crop debt to borrowers who submit loan on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.