कोरोना केअर सेंटरचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:38+5:302021-05-17T04:33:38+5:30

१६ मे रोजी चिखली येथे आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नाने व लोक सहभागातून स्व. दयासागर महाले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ...

Inauguration of Corona Care Center by Devendra Fadnavis | कोरोना केअर सेंटरचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

कोरोना केअर सेंटरचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

Next

१६ मे रोजी चिखली येथे आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नाने व लोक सहभागातून स्व. दयासागर महाले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू झालेल्या आधार कोविड केअर सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

या वेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य भाजप उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर, आ. चैनसुख संचेती, आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष प्रिया बोन्द्रे, सभापती सिंधू तायडे, उपनगराध्यक्ष नजिरा बी शे. अनिस, उपसभापती शमशाद बी शाहिद पटेल, ज्येष्ठ नेते सतीश गुप्त, शरद भाला, डॉ. प्रतापसिंह राजपूत, ॲड. विजय कोठारी, रामकृष्ण शेटे, शहर अध्यक्ष पंडित देशमुख, तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सभापती ममता बाहेती, विमल देव्हडे, गोविंद देव्हडे, नामु रूदासानी आदी उपस्थित हाेते़

सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी फीत कापून आधार कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर सर्व सुविधायुक्त आधार कोविड केअर सेंटरची पाहणी केली. आधार सेंटरला २० ऑक्सिजन तर ५० सर्वसामान्य खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. गत एका वर्षापासून आपण कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहोत. चिखली येथील बहुतांश रुग्ण हे औरंगाबाद, अकोला व बुलडाणा येथे उपचारासाठी जातात. पण त्यांना तेथे बेड मिळत नाही. शिवाय तेथे त्यांना अव्वाच्या सव्वा रक्कम मोजावी लागते. आधार कोविड सेंटरच्या माध्यमातून आपण त्यांना मानसिक तसेच आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करून आधार रुग्णालय राज्यात आदर्श कोविड सेंटर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी केले. माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत काेराेनाविषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला़

केंद्राने सर्वाधिक मदत महाराष्ट्राला केली

केंद्र सरकारने कोरोना काळात महाराष्ट्राला सर्वात जास्त मदत केली असून रेमडेसिविर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सर्वात जास्त पुरवठा महाराष्ट्राला केला आहे. या कठीण काळात आपण सर्वांनी कोणताही भेदभाव न ठेवता, सर्वांनी सोबत येऊन प्रत्येक रुग्णाच्या मागे उभे राहून कोरोनाला हरवायचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले आहे.

Web Title: Inauguration of Corona Care Center by Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.