पोलिसांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 04:17 PM2020-08-01T16:17:12+5:302020-08-01T16:17:23+5:30

स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रांचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Honoring the meritorious children of the police |  पोलिसांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार

 पोलिसांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  इयत्ता दहावीत विशेष प्राविण्य प्राप्त करणाºया पोलिस पाल्यांसह त्यांच्या पालकांचा  सत्कार  शुक्रवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये  करण्यात आला.
स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित या छोटेखानी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शहर पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपनिरिक्षक गौरव सराग यांची उपस्थिती होती. याप्रसंगी धनश्री गजानन वाघमारे, तुषार कैलास सातव, निखिल प्रताप चेपटे, रोहन दिनेश घुगे, दिपाली गजानन आंधळे, सैय्यद सैफ सैय्यद मुजीब, साक्षी अतुल आगलावे, मोहित निलसींग चव्हाण, केतन संतोष जाधव यांच्यासह आदी पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रांचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन पीएसआय गौरव सराग यांनी केले.
 
अनेकांना गहीवर!
 गुणवंतांसोबतच शहर आणि शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यरत पोलिसांचा एकाचवेळी सत्कार करण्यात आला.  पोलिस स्टेशनमध्ये गुणवंत पाल्यासोबत झालेल्या सत्कारांमुळे अनेक पोलिसांच्या डोळ्यात अश्रृ तरळले होते. तर अनेकांना गहीवर आला होता.

Web Title: Honoring the meritorious children of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.