मोठी देवीला श्रध्देचा निरोप ; खामगावात ऐतिहासिक शांती महोत्सवाची  सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 01:39 PM2019-10-23T13:39:21+5:302019-10-23T13:39:28+5:30

विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Great Goddess; historic Peace Festival in Khamgaon | मोठी देवीला श्रध्देचा निरोप ; खामगावात ऐतिहासिक शांती महोत्सवाची  सांगता

मोठी देवीला श्रध्देचा निरोप ; खामगावात ऐतिहासिक शांती महोत्सवाची  सांगता

googlenewsNext

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव :  संपूर्ण देशात  एकमेव खामगाव शहरात भक्तीभावाने साजरा केल्या जाणाºया शांती महोत्सवाची बुधवारी सांगता झाली. यावेळी हजारो  भाविकांनी मानाच्या मोठी देवीला श्रध्देचा निरोप दिला. विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
 खामगाव शहरात यावर्षी कोजागिरी पौणिमेच्या दिवशी म्हणजेच १३  आॅक्टोबर रोजी शांती महोत्सवाला सुरूवात झाली होती. शहरातील जगदंबा रोड भागात सार्वजनिक मोठी देवी जगदंबा नवरात्रोत्सव मंडळासोबतच विविध मंडळांनी मोठी देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. दरम्यान, दहा दिवसांच्या पूर्जा अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांती उत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी मोठी देवी जवळ होम हवन करण्यात आले. त्यानंतर बुधवारी शांती महोत्सवाची सांगता झाली. दुपारी १ वाजताच्या दरम्यान, जलालपुरा भागातून मोठी देवीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. जगदंबा रोड, मेनरोड, गांधी चौक, अकोला बाजार, जनता बँक, परत जगदंबा रोड, भुसावळ चौक, मोठा पुल मार्गे दुपारी  ३ वाजता ही मिरवणूक सतीफैलात पोहोचली.  याठिकाणी मोठी देवीची सामुहिक आरती करण्यात आली. काही वेळाच्या विसाव्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मोठी देवीच्या मिरवणुकीला पुन्हा सुरूवात झाली. ठक्कर आॅईल मिल, शिवाजी नगर, मोठा पुल, सरकी लाईन, मेनरोड, फरशी, सराफा पोस्ट आॅफीस, राणा गेट जवळून पुरवार गल्ली, शिवाजी वेस, सत्यनारायण मंदीर, घाटपुरी नाका, छोटी देवी मंदीर, जगदंबा संस्थान मार्गे घाटपुरी नदीच्या पुलापर्यंत पोहचून तेथून बायपास मार्गे उशिरा रात्री जनुना तलाव येथे  देवीचे विसर्जन करण्यात आले.

 
भाविकांची अलोट गर्दी!

ग्रामदैवत असलेल्या आई जगदंबेला (मोठी देवी) श्रध्देचा निरोप देण्यासाठी खामगाव आणि परिसरातील भाविकांची मोठी गर्दी जमली होती. दुपारी १२ वाजता जलालपुºयात सामुहिक आरती करण्यात आली. त्यानंतर मोठी देवीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. यावेळी ठिकठिकाणी भाविकांना चहा, नास्ता आणि फराळाचे वितरण करण्यात आले.

Web Title: Great Goddess; historic Peace Festival in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.