Gram Panchayat Election : अधिसूचनेनंतरच मिळणार सदस्यांना प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:04 PM2021-01-20T12:04:17+5:302021-01-20T12:04:33+5:30

प्रत्यक्षात निवडून आल्याचे प्रमाणपत्र अद्याप सदस्यांच्या हातात पडलेले नाही.

Gram Panchayat Election: Certificates will be given to the members only after notification | Gram Panchayat Election : अधिसूचनेनंतरच मिळणार सदस्यांना प्रमाणपत्र

Gram Panchayat Election : अधिसूचनेनंतरच मिळणार सदस्यांना प्रमाणपत्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांना निवड झाल्याचे प्रमाणपत्र मिळण्यास प्रतीक्षा करावी लागत आहे. २१ जानेवारीपर्यंत शासनाची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतरच प्रमाणपत्र मिळणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींचा निकाल प्रसिद्ध झाला आहे. तहसीलस्तरावर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.  त्यानुसारच उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. प्रत्यक्षात निवडून आल्याचे प्रमाणपत्र अद्याप सदस्यांच्या हातात पडलेले नाही. त्यासाठी त्यांना अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रमाणपत्र मिळेल, असे सांगण्यात आले आहे. ५२७ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची निवड झाली आहे. त्यापैकी २९ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची निवड अविरोध झाली आहे. त्या सर्व सदस्यांची नावे शासनाच्या अधिसूचनेत प्रसिद्ध केली जातील. त्यानंतर त्या यादीनुसार सदस्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.

Web Title: Gram Panchayat Election: Certificates will be given to the members only after notification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.