शहीद प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:17 PM2020-12-19T12:17:16+5:302020-12-19T12:19:32+5:30

Funeral of martyr Pradip Mandale त्यांचे पार्थिव अैारंगाबाद येथून सिंदखेड राजा तालुक्यातील त्यांच्या मुळगावी पळसखेड चक्का येथे आणण्यात येईल.

Funeral of martyr Pradip Mandale on Sunday | शहीद प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार

शहीद प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देप्रदीप मांदळे यांचा हिमकडा कोसळून १५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये ही घटना घडली होती.

 लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील शहीद सैनिक प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.२०) सकाळी ९:३० वाजेदरम्यान त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचे पार्थिव दिल्ली येथे पोहोचले होते.
पळसखेड चक्का येथील सैनिक प्रदीप मांदळे यांचा हिमकडा कोसळून १५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये ही घटना घडली होती. प्रदीप मांदळे हे २००८ मध्ये सैन्यात भरती झाले होते. गेल्या ऑगस्ट महिन्यात ते १५ दिवसांच्या सुटीवर गावी येऊन गेले होते. तीच त्यांची कुटुंबीयांशी शेवटची भेट ठरली होती. दिल्लीवरून त्यांचे पार्थिव मुंबई येथे आणण्यात येईल. तेथून ते अैारंगाबाद येथे आणण्यात येईल. तेथे त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर रविवारी (दि. २०) सकाळी ६ वाजता त्यांचे पार्थिव अैारंगाबाद येथून सिंदखेड राजा तालुक्यातील त्यांच्या मुळगावी पळसखेड चक्का येथे आणण्यात येईल. तेथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बी. एन. पडघान यांनी दिली. या अंत्यविधीच्या कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे.

Web Title: Funeral of martyr Pradip Mandale on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.