बुलडाणा शहरालगत अस्वलचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 11:05 AM2021-07-29T11:05:17+5:302021-07-29T11:05:25+5:30

Free movement of bears around Buldana city : २७ जुलै रोजी काहींनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काहींनी या अस्वलाला कॅमेऱ्यात कैद केले.

Free movement of bears around Buldana city | बुलडाणा शहरालगत अस्वलचा मुक्त संचार

बुलडाणा शहरालगत अस्वलचा मुक्त संचार

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहरालगतच्या नळगंगा व्ह्यू पॉईंटनजीक अस्वलाचा मुक्त संचार सध्या असून असून २७ जुलै रोजी काहींनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काहींनी या अस्वलाला कॅमेऱ्यात कैद केले. शहराच्या सीमेलगत अस्वलाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
निवांतपणे हे अस्वल रस्ता अेालांडत असल्याचे दिसून आले. दरम्यान गेल्या दोन महिन्यापूर्वी मलकापूर रोडवरील बुद्ध विहाराजवळही अस्वल व त्याचे पिल्लू रस्ता अेालांडतांना दिसून आले होते. त्यामुळे बुलडाणा शहरालगत अस्वलाचा संचार आता वाढला असल्याचे दिसून येत आहे.
मॉर्निंग वाकला जाणाऱ्यांनही सकाळी या मार्गावर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दरम्यान ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे. बिबट्यांचेही प्रमाण या भागात अधिक आहे. १९९० च्या दशकत अस्वलांचा चक्क शहरात बऱ्याच वेळा रामनगर, जुनगाव लगतच्या भागात वावर दिसून आला होता. आता पुन्हा अस्वलांचा शहरालगत वावर दिसून येत आहे. यापूर्वी सव, येळगावच्या पट्ट्यातही दिवसा अस्वलांचा वापर दिसून येत होता.

Web Title: Free movement of bears around Buldana city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.