शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणाची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:34 AM2020-10-11T11:34:58+5:302020-10-11T11:35:13+5:30

Buldhana, Farmer, Agriculture, Rain गुरूवारी रात्री व शुक्रवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

Farmers in Buldhana District fear cloudy weather | शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणाची धास्ती!

शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणाची धास्ती!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मागील वर्षी ऐन सोयाबीन काढण्याच्या हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. १५ दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्यानंतर आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा सोयाबीनचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकºयांची सोयाबीन काढण्याची धडपड सुरू आहे. गुरूवारी रात्री व शुक्रवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
सोयाबनी सोंगणीचा हंगाम सुरू असताना आता पावसाचे वातावरण झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली आहे. शहराच्या मुख्य रस्त्याला लागुनच मोठ्या प्रमाणात मेनकापडाची दुकाने लागलेली दिसून येत आहे. ताडपत्र्यांची दुकाने सजली असून ताडपत्री खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता असल्याने सोयाबीनची सुडी झाकण्यासाठी शेतकरी मेनकापडाची खरेदी करीत आहे. सध्या ताडपत्र्यांचे दर वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन सोंगणीचा हंगाम आता अंतीम टप्प्यात असल्याने आणि त्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होऊ नये, यासाठी सोयाबीन सुडी झाकण्याकरीता शेतकरी ताडपत्र्यांची खरेदी करताना दिसून येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यामध्ये जालना, आरंगाबाद येथून ताडपत्र्यांचा माल येतो. लॉकाडाऊन काळात यंदा माल येऊ शकला नाही. त्यामुळे सध्या मागील वर्षीचाच माल विक्रीसाठी वापरल्या जात आहे. सध्या ६५ रुपय मिटरने ताडपत्र्यांची विक्री होत आहे.

Web Title: Farmers in Buldhana District fear cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.