पूर्वतपासणी शिबिरात १० हजार रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 03:03 PM2019-08-01T15:03:22+5:302019-08-01T15:03:26+5:30

पुर्वतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार पेक्षा जास्त रुग्णांची पुर्व तपासणी करण्यात आली आहे.

Examination of 10,000 patients in pre-diagnosis camp | पूर्वतपासणी शिबिरात १० हजार रुग्णांची तपासणी

पूर्वतपासणी शिबिरात १० हजार रुग्णांची तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: जनतेला सुदृढ व निरोगी आयुष्य मिळावे या उद्देशाने स्व. भाऊसाहेब फुंडकर जनआरोग्य शिबीर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा केशव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय कोठारी यांच्या संकल्पनेतून सुंपर्ण चिखली मतदार संघात राबविण्यात येत आहे. २९ जुलै ते १० आॅगस्ट दरम्यान पुर्व तपासणी शिबीर होत असून या पुर्वतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार पेक्षा जास्त रुग्णांची पुर्व तपासणी करण्यात आली आहे.
शिबिरासाठी एकूण १४ डॉक्टर्सं व १०३ वैद्यकिय विद्यार्थी असे एकूण ११८ जण संपुर्ण मतदार संघात आरोग्यसेवा देत आहेत. या सर्वांना १४ वेगवेगळया चमुमध्ये विभाजित करण्यात आले आहे. चमु एकाच वेळी मतदार संघातील १४ गावांमध्ये वैद्यकिय सेवा देत आहे. पुढील काही दिवसात ही चमु उर्वरित गावांना भेट देणार असून तेथील नागरिकांची तपासणी करणार आहे. दररोज सकाळी ६ वाजता चमुतील संपुर्ण सदस्य डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालय येथे एकत्र येतात. तेथुन आवश्यक ते साहित्य घेऊन गावांना भेट देतात. या शिबिरामार्फत एक लाख रुग्णांची सेवा करण्याचा मानस असल्याचे शिबिराचे आयोजक अ‍ॅड. विजय कोठारी यांनी सांगितले. या पुर्व तपासणी शिबिराला आतापर्यंत अ‍ॅड. विजय कोठारी यांचेसह शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला , चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिशजी गुप्ता, डॉ. सौरभ कोठारी भाजपाचे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या असून आवश्यक त्या सुचना करीत आहेत.
११ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चिखली येथील मौनिबाबा संस्थानमध्ये आरोग्य तपासणी महाशिबीर संपन्न होणार आहे. या शिबिराचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार आहे.
या शिबिरामध्ये मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथील तज्ञ डॉक्टर्स आपली सेवा देणार आहेत. तसेच सर्व नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, मेंदुरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टीक सर्जरी, कान-नाक-घसा, स्त्री-रोग, कर्करोग, दंतरोग, श्वसनविकार व क्षयरोग, ग्रंथींचे विकार, लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, त्वचा व गुप्तरोग यासोबतच जनरल मेडीसीन यासर्व प्रकारच्या विकारांची तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. स्व. भाऊसाहेब फुंडकर जनआरोग्य शिबिराचा मतदार संघातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड. विजय कोठारी यांनी केले आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Examination of 10,000 patients in pre-diagnosis camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.