डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 03:02 PM2019-12-03T15:02:42+5:302019-12-03T15:03:09+5:30

नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे.

Even after December, farmers did not get water from dam for crop | डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही!

डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही!

Next

- योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्हयातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या नळगंगा प्रकल्पामध्ये १०० टक्के जलसाठा उपलब्ध असल्यानंतरही अद्याप क्षेत्रातील शेतकर्यांच्या बांधावर पाणी पोहचले नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे याप्रकाराकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नळगंगा प्रकल्प हा मोताळा तालुक्यात आहे. मलकापूर शहराची तहान भागविण्यासोबत मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यातील शेतकºयांना रब्बी हंगामाला पाणी यामाध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. या प्रकल्पाची साठवण क्षमता ९९.६६ द.ल.घ.मी. एवढी आहे. गत पाच वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला होता. यामुळे शेतीतून उत्पन्न निघू न शकल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले. याउलट यावर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पिकेही चांगली होती. मात्र ऐन पिकांच्या काढणीच्यावेळी अतिवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. बुलडाणा जिल्हयातील मलकापूर, नांदुरा, खामगाव, संग्रामपूर व जळगाव या तालुक्यात सर्वाधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसाने खरिपाचे पिक हातचे गेले आहे. खरीप गेल्याने आता शेतकºयानी रब्बी हंगामापासून अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यामुळे हरभरा, कांदा, गहू आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे.

पैसे भरले तरी पाणी मिळेना!

नळगंगा प्रकल्पाअंतर्गत ३३ पाणी वापर संस्था कार्यान्वीत आहेत. समित्यांकडे शेतकºयांनी पैसेही भरले. मात्र अद्याप पाणी न मिळू शकल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. कालव्यांची देखभाल दुरुस्ती व साफसफाई बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. समित्यांचेही प्रतिनिधीही शेतकºयांपैकीच असल्याने त्यांचीही प्रकल्पाच्या अधिकाºयांकडून दिशाभूल केली जात असल्याचे दिसून येते. खरिप गेला आता रब्बीसाठी तरी वेळेवर पाणी मिळावे अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.


यावर्षी शेतकरी आधीच हतबल झाला आहे. त्यात वेळेवर मदत मिळावी ही अपेक्षा आहे. लवकरात लवकर अडचणी सोडवून शेतकºयांना पाणी उपलब्ध करुन द्यावे जेणे करुन रब्बी हंगामासाठी लाभ होवू शकेल.
- निनाजी फरपट,
शेतकरी, सिरसोडी


नळगंगा प्रकल्पाअंतर्गत जवळपास ३३ पाणी वापर संस्था येतात. कालव्यांची साफसफाई बाकी आहे. लवकरच हे काम सुरु होईल. शेतकºयांना २० डिसेंबरपासून पाणी मिळेल.
- शरद नागरे,
शाखाधिकारी,
नळगंगा प्रकल्प.

Web Title: Even after December, farmers did not get water from dam for crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.