विनापरीक्षा पासच्या निर्णयाला इंग्रजी शाळांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:47 AM2021-04-08T11:47:37+5:302021-04-08T11:47:55+5:30

English schools oppose the decision to pass the exam: विनापरीक्षा वरच्या वर्गात प्रवेश देणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड करण्यासारखे आहे.

English schools oppose the decision to pass without exam | विनापरीक्षा पासच्या निर्णयाला इंग्रजी शाळांचा विरोध

विनापरीक्षा पासच्या निर्णयाला इंग्रजी शाळांचा विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. असे असले तरी खासगी इंग्रजी शाळांनी त्याला विरोध केला आहे. वर्षभर वर्गांना उपस्थित नसणाºया विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घेणार नाही असा पुनरुच्चार केला आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे गेले वर्षभर शाळा बंद राहिल्या. या काळात ऑनलाईन वर्ग सुरू राहिले. डिसेंबरनंतर टप्याटप्याने आॅफलाईन वर्गही सुरू झाले. पण अनेक विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही वर्गांना अनुपस्थित राहिले. त्यांना वरच्या वर्गात प्रवेश देणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड करण्यासारखे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान होणार आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा ऑनलाईन स्वरुपात घेण्याची तयारी असताना परीक्षा न घेण्याचा शिक्षणमंत्र्यांचा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे सलग दुसºया वर्षी मुलांचे मूल्यमापन होणार नाही. 
यामुळे चुकीचा पायंडा पडत आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत १० ते १५ टक्के विद्यार्थी संपूर्ण वर्षभर गैरहजर आहेत. त्यांना पुढील वर्गात प्रवेश न देणे योग्य नाही. त्यांच्याकडून कोणतेही वेगळे किंवा अतिरिक्त शुल्क न घेता त्यांना यावर्षीदेखील त्याच वर्गात प्रवेश दिला जाईल. खुद्द अनेक पालकदेखील आपल्या मुलाला पुन्हा जुन्याच वर्गात बसविण्याची विनंती करीत आहेत.

Web Title: English schools oppose the decision to pass without exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.