निवडणूक प्रक्रिया राष्ट्रीय उत्सव - गौरी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:41 PM2019-10-12T18:41:40+5:302019-10-12T18:42:01+5:30

. विधानसभा निवडणुकीबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्याशी साधलेला संवाद...

Election Process National Festival - Gauri Sawant | निवडणूक प्रक्रिया राष्ट्रीय उत्सव - गौरी सावंत

निवडणूक प्रक्रिया राष्ट्रीय उत्सव - गौरी सावंत

googlenewsNext

ब्रम्हानंद जाधव 
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे. या आरचासंहितेचा भंग झाल्याची तक्रार आल्यास १०० मिनीटाच्या आत त्याचा निपटारा लावला जातो. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्याशी साधलेला संवाद...

निर्भय व नि:पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?

- जिल्ह्याची भौगोलिक सीमा मध्य प्रदेश राज्यास लागून असल्याने निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन्ही राज्यातील संबंधित जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बैठक घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भूजबळ यांच्या नेतृत्वाखाली ‘एफएसटी’ ‘एसएसटी’ ‘व्हीएसटी’ टीम नियुक्त करण्यात आले आहेत. आंतरराज्यस्तरावरील चार आणि जिल्हास्तरावर १२ चेकपोस्टवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार २६३ मतदान केंद्र असून सर्व केंद्रावर ‘एएमएफ’ उपलब्ध करून दिली आहे. केंद्रावर जवळपास १० हजार ६०० निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर २१७ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

खर्चाचे नियोजन कसे आहे?

- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २३ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाकडे पहिल्या टप्प्यात २८ लाख तर दुसºया टप्प्यात १४ कोटी असा एकुण १४ कोटी २८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तसे इस्टीमेट राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून निधीची उपलब्धता करून घेता येईल.

कामाच्या व्यापात आरोग्य कसे सांभाळता?

- निवडणुकीची कामे करताना रात्री अनेकवेळा उशीरही होतो. तर कधी सकाळपासूनच कामे सुरू असतात, त्यामुळे आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष होते. त्यासाठी आवश्यक तो पुरेसा आहार व थोडा व्यायाम कार्यक्षमता टिकविण्यासाठी करते.

लोकसभा निवडणुकीच्या अनुभवाचा फायदा काय?

- लोकसभा निवडणूक २०१९ चा अनुभव पाठीशी असल्याने त्याचप्रमाणे त्यावेळी आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नये, यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच गोष्टींची आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘गो व्होट’ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रिया हा राष्ट्रीय उत्सव असतो. ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी महसूल सोबतच सर्वच विभागाची आहे

Web Title: Election Process National Festival - Gauri Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.