Demand for installation of a statue of Guru Ravidas | गुरु रविदास यांचा पुतळा बसवण्याची मागणी

गुरु रविदास यांचा पुतळा बसवण्याची मागणी

बुलडाणा : शहरात गुरु रविदास यांचा भव्य आसनारुढ पुतळा बसवून भव्य स्मारक निर्माण करावे अशी मागणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद व बुलडाणा शहरातील चर्मकार समाज बांधवाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़

कोविड-१९ मुळे प्रतिनिधीक स्वरुपात काँग्रेसचे जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजिनियर डि.टी.शिपणे यांच्या प्रमुख नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले़ बुलडाणा शहरात आपल्या आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून जवळपास सर्वच महामानवांचे पुतळे बसविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर १४ व्या शतकात सामाजिक प्रबोधन व विद्रोही साहित्य निर्मिती करुन तात्कालिन व्यवस्थेविरुद्ध तिव्र लढा देऊन परिवर्तनवादी विचार मांडणारे गुरु रविदास यांचा सुध्दा आसनारुढ पुतळा व भव्य-दिव्य स्मारक असावे असा मानस चर्मकार समाज बांधवांचा आहे. त्यामुळे बुलडाणा शहरात गुरु रविदास यांचा भव्य आसनारुढ पुतळा बसवून भव्य स्मारक निर्माण करावे अशी मागणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि. डि.टी.शिपणे,युवाप्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, जिल्हा संघटक अनिल बोरकर,प्रसिद्धीप्रमुख समाधान चिंचोले,यांच्यासह समाज बांधवांकडून करण्यात आली आहे़ या मागणीला आमदार संजय गायकवाड यांनी दुजोरा दिला असून गुरु रविदास यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी जी काही मदत लागेल ती मी देण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले़

Web Title: Demand for installation of a statue of Guru Ravidas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.