पटसंख्या शून्य असतानाही शिक्षकांच्या समायोजनास विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 05:55 PM2019-12-06T17:55:19+5:302019-12-06T17:55:47+5:30

इंदिरा गांधी नगर पालिका हायस्कूलमधील  विद्यार्थी संख्येसंदर्भात चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी माहिती शासनास सादर केली.

Delay in teacher adjustment even when the number is zero! | पटसंख्या शून्य असतानाही शिक्षकांच्या समायोजनास विलंब!

पटसंख्या शून्य असतानाही शिक्षकांच्या समायोजनास विलंब!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  पटसंख्येच्या घोळामुळे चव्हाट्यावर आलेली म्युनिसिपल हायस्कूल अखेर बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत एकही विद्यार्थी पटावर नसताना मुख्याध्यापकांसह ६ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाºयांच्या पगारापोटी शासनाच्या लक्षावधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. शिक्षकांच्या समायोजनास शिक्षण विभागाकडून विलंब होत असल्याची चर्चा आहे.
स्थानिक नगर पालिकेच्या इंदिरा गांधी नगर पालिका हायस्कूलमधील  विद्यार्थी संख्येसंदर्भात चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी माहिती शासनास सादर केली. या माहितीच्या आधारे सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षांत संच मान्यतेनुसार नियमबाह्य शिक्षकसंख्या मान्य करून घेतली. मात्र, प्रत्यक्षात प्रभारी मुख्याध्यापकांनी सादर केलेली माहिती आणि वस्तुस्थितीत प्रचंड तफावत आढळून आली. संगनमताने नियमबाह्य शिक्षकसंख्या मान्य करून शासनाची लाखो रूपयांची फसवणूक आणि नुकसान केले. दरम्यान, याप्रकरणी २३ जुलै २०१८ रोजी पहिल्यांदा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयासोबतच वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई न झाल्याने, संबंधित तक्रारदारांनी  १३ फेब्रुवारी २०१९ रोजी शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांकडे यासंबधी तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने ३० मार्च रोजी उपशिक्षणाधिकारी एस.एस.काळुसे संबंधीत शाळेत धडकले होते.
 
शाळेतील शून्य पटसंख्येचा  अहवाल नगर परिषद मुख्याधिकारी आणि शिक्षण विभाग बुलडाणा यांच्याकडे सादर केला आहे. सद्यस्थितीत शाळेत ६ शिक्षक कार्यरत आहेत. ३ शिक्षकेत्तर कर्मचाºयांना नगरपालिकेच्या सेवेत सामावण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी शिक्षणाधिकाºयांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. शिक्षणाधिकारी आदेश देतील तसे बदल शिक्षकांसंदर्भात केले जातील.
-गजेंद्र जोगदंड
प्रभारी मुख्याध्यापक, म्युनिसिपल हायस्कूल, खामगाव.

Web Title: Delay in teacher adjustment even when the number is zero!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.