हिरडव शिवारात एकाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 03:31 PM2020-09-19T15:31:12+5:302020-09-19T15:31:21+5:30

गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

The decomposed body of one was found in Hirdav area | हिरडव शिवारात एकाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला

हिरडव शिवारात एकाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला

Next

लोणार: तालुक्यात गेल्या १५ दिवसात मद्याच्या कारणावरून तीन जणांचे खून झाल्याच्या घटना ताज्या असतानाच तालुक्यातील हिरडव शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, या प्रकरणी लोणार पोलिसानी घटनास्थळी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे गळफास घेतलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला असला तरी मृत व्यक्तीचे कुजलेले पार्थिव खाली पडलेले होते तर डोके तेवढे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे मृतदोची नेमकी ओळख पटविण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे.
लोणार तालुक्यात सप्टेंबर महिन्यात नातवाने मद्याच्या पैशासाठी आजीचा विळ््याचे वार करून खून केला होता. या घटनेनंतर हिरडव येथील एकाने मद्याच्या व्यसनातून पत्नीचा साडीच्या पदराने गळा आवळून खून केल्याची घटना चार सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. या दोन्ही घटनानंतर १७ सप्टेंबर रोजी मद्यपी वडिलांचा मुलानेच मारहाण करीत तथा गळाआवळून खून केल्याचे समोर आले होते. प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून लोणार पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
त्यातच १९ सप्टेंबर रोजी हिरडव-पळसखेड शिवारात जगन सोनुने यांच्या शेतात एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचे डोके आढळून आले तर त्याचे पार्थिव झाडाखालीच कुजलेल्या स्थितीत आढळून आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसली तरी त्यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.
त्यामुळे या प्रकरणात नेमके काय काय बाहेर येते याकडे सध्या लक्ष लागून आहे. १९ सप्टेंबरला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित शेतकºयाने गावातील पोलिस पाटील यांना त्याची कल्पना दिली. पोलिस पाटील यांनी लोणार पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: The decomposed body of one was found in Hirdav area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.