‘कर्जमुक्ती’च्या याद्याच अपलोड नाहीत, ‘केवायसी’ कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 03:34 PM2020-02-22T15:34:16+5:302020-02-22T15:34:25+5:30

याद्याच अपलोड नाहीत तर केवायसीसाठी किती वेळ लागेल व कर्जमुक्ती कधी, होईल असा प्रश्न आहे.

'Debt-free' lists are not uploaded, when will 'KYC' be? | ‘कर्जमुक्ती’च्या याद्याच अपलोड नाहीत, ‘केवायसी’ कधी होणार?

‘कर्जमुक्ती’च्या याद्याच अपलोड नाहीत, ‘केवायसी’ कधी होणार?

Next

- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ‘महात्मा फुले ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे अल्पमुदत पीककर्ज आणि पीक पुनर्गठित कर्ज माफ होणार आहे. बँक प्रशासनाकडून याद्या अपलोड करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्याच याद्या अपलोड होवू शकल्या आहेत. त्यामुळे ‘याद्याच अपलोड नाहीत तर केवायसीसाठी किती वेळ लागेल व कर्जमुक्ती कधी, होईल असा प्रश्न आहे.
कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थी शेतकºयांची माहिती कर्जमाफीच्या पोर्टलवर १५ फेब्रुवारीपर्यंत भरायची होती. योजनेचे निकष व अपात्रतेचे निकष लावून पात्र कर्जदार शेतकºयांना विशिष्ट क्रमांक देण्यात येवून ई - केवायसी करावी लागणार आहे.
अद्याप याद्या अपलोड करण्याचे काम सुरु असल्याने सहकार विभागाला ही माहिती कळवण्यास आणखी किती विलंब लागेल, हे निश्चित नाही. २० फेब्रुवारी पासून केवायसी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले असतानाही बँक प्रशासनाकडून याद्या अपलोड होवू शकल्या नाहीत. त्यामुळे केवायसी कधी होईल, असा प्रश्न आहे. प्रशासकीय पातळीवर त्यामुळे जोरकस प्रयत्नांची गरज आहे.
केवायसी प्रक्रिया गरजेची
शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमाकांची पडताळणी करण्याची सुविधा सर्वच सिएससी केंद्रात उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांचे सत्यापन व प्रमाणीकरणाचा कार्यक्रम २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान राबविला जाणार आहे. यासाठी सिएससी केंद्र संचालकांनी शेतकºयांना सन्मानाची वागणूक द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांनी केले आहे.


बुलडाणा जिल्ह्यात बँकाकडून कर्जदार शेतकºयांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरु आहे. अद्याप १ लाख ९० हजार शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत.
- डॉ. सुमन चंद्रा
जिल्हाधिकारी, बुलडाणा


बँक प्रशासनामार्फत पोर्टलवर याद्या अपलोडींगचे काम सुरु आहे. आज सुटी असल्याने नेमका किती आकडा सांगता येणार नाही.
- महेंद्र चव्हाण
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा


ठाकरे सरकारचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. पण प्रशासनाला त्याचे गांभिर्य दिसत नाही.
- दीपक गायकवाड
नांदुरा

Web Title: 'Debt-free' lists are not uploaded, when will 'KYC' be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.