१८ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज: पालकमंत्र्यांच्या निर्देशाला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:37 AM2020-06-30T11:37:29+5:302020-06-30T11:38:33+5:30

३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे.

Crop loan to 18% farmers only: Guardian Minister's directive not followed | १८ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज: पालकमंत्र्यांच्या निर्देशाला खो!

१८ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज: पालकमंत्र्यांच्या निर्देशाला खो!

googlenewsNext

- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पीक कर्ज वाटप करण्यात दिरंगाई करणाºया बँकावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला होता. तरीही बँकांमध्ये कर्ज वाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरू असून लक्षांकाच्या केवळ १८ टक्के शेतकऱ्यांनाच २९ जून पर्यंत कर्ज वाटप करण्यात आले. ३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे. त्यामुळे २ लाख ९६ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकºयांचा शेतमाल घरातच पडून आहे. त्यामुळे, शेतकºयांसमोर खरीपाची पेरणी करण्याचे आव्हान होते. शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देउन दिलासा दिला. मात्र, बँकाकडून शेतकºयांना कर्ज वितरण करण्यास मोठा विलंब होत असल्याचे चित्र आहे. पेरणीसाठी पीक कर्ज मिळेल,अशी आशा असलेल्या शेतकºयांनी बँकाकडे अर्ज केले. मात्र, विविध दाखल्यांसाठी बँकाकडून अडवणुक होत असल्याने अनेक शेतकरी अजुनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.
पीक कर्ज वाटपाची गती संथ असल्याने पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेउन बँकांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पीक कर्ज वाटपात दिंरगाई करणाºया बँकाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीही बँकांची पीक कर्ज वाटपाची गती वाढली नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एक लाख ३० हजार शेतकरी पीक कर्जासाठी पात्र आहेत. यापैकी २९ जून पर्यंत बँकांनी ६६ हजार शेतकºयांना ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अजुनही ६४ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अर्ध्यापेक्षा अधीक शेतकºयांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
मृग नक्षत्रात जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवस पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेकांचे सोयाबीन न निघाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पैशांची गरज असताना बँकाकडून पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे.

लक्ष्यांक दूरच
यावर्षी जिल्ह्यातील बँकांना तीन लाख ६२ हजार शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ६६ हजार शेतकºयांनाच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २ लाख ९४ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २४६० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य आहे. त्यापैकी ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

प्रत्येक शेतकºयाला कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. पात्र ठरलेल्या ५१ टक्के शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उर्वरीत शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच शेतकºयांना पीक कर्ज मिळावे,यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- उत्तम मनवर, व्यवस्थापक,
अग्रणी बँक, बुलडाणा

 

Web Title: Crop loan to 18% farmers only: Guardian Minister's directive not followed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.