कोविड सेंटरचा भोजन पुरवठादार बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:48 AM2020-09-11T11:48:42+5:302020-09-11T11:49:02+5:30

नवीन पुरवठादाराची नियुक्ती  करण्यात आली आहे.

Covid Center's food supplier changed | कोविड सेंटरचा भोजन पुरवठादार बदलला

कोविड सेंटरचा भोजन पुरवठादार बदलला

googlenewsNext

नांदुरा : कोविड केअर सेंटरमधील रूग्णांना दिल्या जाणाºया आहारात अळ््या निघाल्याचे वृत्त लोकमतने गुरूवारी प्रसिद्ध करताच जिल्हाधिकारी एस.षण्मुखराजन यांनी गंभिर दखल घेतली. सेंटरसाठी भोजन पुरवठा करणाºयाचे काम तत्काळ थांबवत दुसºया पुरवठादाराची नियुक्ती करण्याचा आदेश त्यांनी दिला. सोबतच सेंटरवर नियुक्ती असलेल्या कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटिसही तहसीलदार राहुल तायडे यांनी बजावली.   
नांदुरा येथील कोविड सेंटरमधील कोरोना बाधित रुग्णांना ९ सप्टेबर रोजी सकाळी दिलेल्या नाश्त्यात   अळया निघाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची  दखल घेत लोकमतने  सर्वप्रथम बुधवारीच आॅनलाइन तसेच गुरूवारच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी षण्मुखराजन  यांनी याप्रकरणीची दखल घेत तहसिलदार  तायडे यांना भोजन पुरवठादार बदलण्याचा निर्देश दिले. तसेच केअर सेंटरमध्ये दिल्या जाणारे जेवण व नाश्ता याकडे वैयक्तीकरित्या लक्ष देण्याचेही बजावले.  मलकापूरच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी   स्वप्नाली डोईफोडे  यांनीही भोजन पुरवठादार बदलण्याचे निर्देश दिले.  सोबतच कोविड केअर सेंटरचे प्रभारी  गजानन वानखडे व अतिक अहमद अब्दूल यांना नोटीसही बजावण्यात आली. भोजन पुरवठादार जितू महाराज यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. नवीन पुरवठादाराची नियुक्ती  करण्यात आली आहे.

Web Title: Covid Center's food supplier changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.