CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ३७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:56 AM2020-07-13T10:56:07+5:302020-07-13T10:56:14+5:30

रविवारी पुन्हा ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, एकूण रुग्ण संख्या ४८२ झाली आहे.

CoronaVirus: 37 positive in Buldana district | CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ३७ पॉझिटिव्ह

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ३७ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग वाढला असून रुग्ण संख्येतही गेल्या तीन दिवसापासून झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या पाचशेच्या टप्प्यात आली आहे. दरम्यान, रविवारी पुन्हा ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, एकूण रुग्ण संख्या ४८२ झाली आहे.
परिणामी बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून २१ जुलैपर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ७०० च्या घरात जाण्याचा अंदाज यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रामुख्याने जून, जुलै महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत दहा मे रोजी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले होते. रविवारी १७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची रुग्णालयातून सुटी झाली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २३४ जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी १९७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ३७ अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालांपैकी प्रयोगशाळेकडून आलेल्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालापैकी १२ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले तर रॅपीड टेस्टमध्ये २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली. निगेटीव्ह अहवालामध्ये दहा अहवाल प्रयोगशाळेकडून तर रॅपीड टेस्टमध्ये १८७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रविवारी एकूण १९७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पॉझीटीव्ह अहवालामध्ये खामगांव शहरातील २० जणांचा समावेश आहे. यात दोन वृद्ध महिला, रेखा प्लॉटमधील ४० वर्षीय व्यक्ती सुटाळा येथील महिला, शिवाजीनगरमधील ३८ वर्षीय महिला, वाडी येथील तीन, शंकर नगरमधील नऊ व्यक्ती, दाल फैल भागातील ४० वर्षीय महिला, केला नगरमधील ३१ वर्षीय महिला व सहा महिन्याच्या मुलाचा यात समावेश आहे.
मलकापूर शहरातील चार जणांचा बाधीत रुग्णांमध्ये समावेश असून शिवाजीनगर मधील दोन पुरुष मंगल गेट परिरातील ६६ वर्षीय वृद्ध व ६२ वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. दरम्यान चिखली शहरातील पाच जणांचा समावेश यात असून २९, २१, ४९, ४५ व ४९ वर्षीय महिला व पुरुषांचा यात समावेश आहे. शेगावातील एसबीआय कॉलनीतील एक व्यक्ती तथा देऊळगाव राजा शहरातील दुर्गापुरा भागात वास्तव्यास असलेली वृद्ध महिला, मेहकरमधील सावजी गल्लीत असलेला २४ वर्षीय व्यक्तीही बाधीत आहे. चिखली तालुक्यातील करवंड येथील ४० वर्षीय पुरुष आणि मुळची मुंबईतील उल्लासनगर भागातील रहिवाशी असलेली ४५ वर्षीय महिला बाधीत आढळून आली. मोताला तालुक्यातील गुळभेली येथील ४७ वर्षीय व्यक्तीसह अन्य दोन व्यक्ती असे एकूण ३७ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. रविवारी एकूण १७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये जळगांव जामोद येथील ५० वर्षीय महिला, शेगावातील जोगडी फैलमधील चार वर्षाचा मुलगा, ३० वर्षीय महिला, नांदुरा ेथील ३७ वर्षाची महिला, खामगावातील समर्थनगरमधील महिला, नांदुर्यातील घासलेटपुरा भागातील तीन मुले, ४५ व २४ वर्षीय व्यक्ती तथा सहा वर्षाच्या एका मुलाचाही यात समावेश आहे. सध्या २१३ व्यक्तींवर उपचार करण्यात येत आहे.

Web Title: CoronaVirus: 37 positive in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.