CoronaVirus : बुलडाण्यात १० नवे पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 04:27 PM2020-08-03T16:27:17+5:302020-08-03T16:27:27+5:30

गेल्या दोन दिवसांमध्ये बुलडाणा शहरातील वेगवेळ्या भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

Coronavirus: 10 new positive in bulldozer | CoronaVirus : बुलडाण्यात १० नवे पॉझिटिव्ह 

CoronaVirus : बुलडाण्यात १० नवे पॉझिटिव्ह 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना आता बुलडाणा शहरातही कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये बुलडाणा शहरातील वेगवेळ्या भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ३ आॅगस्ट रोजी आणखी १० नवे पॉझिटिव्ह बुलडाण्यात सापडले आहेत. जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या १ हजार ४०० च्यावर पोहचली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग आता वाढलेला आहे. त्या पाठोपाठ बुलडाणा शहर परिसरातही रुग्ण सापडण्याचे वाढल्याचे चिंताजनक चित्र आहे. सोमवारी पुन्हा १० पॉझिटिव्ह बुलडाणा शहरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील विविध भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये बुलडाण्यातील लांडे ले आऊटमध्ये ३५ वर्षीय डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले. सरस्वती नगर मधील २९ वर्षीय महिला व ४० वर्षीय पुरुष, बाजार समिती परिसरात ४३ वर्षीय व ७७ वर्षीय महिला, सुवर्ण नगर मध्ये ६३ वर्षाचा वृद्ध, संगम चौकात ४५ वर्षीय महिला, भीमनगरमध्ये ७६ वर्षीय वृद्ध, जिजामाता नगर मधील ५८ वर्षीय पुरुष व आणखी एक ४५ वर्षीय पुरुष असे एकूण १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. रॅपिड टेस्ट मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रविवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३५८ अहवाल प्राप्त झाले होते. यापैकी ३०७ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४३ व रॅपिड टेस्टमधील आठ अहवालांचा समावेश आहे. रविवारी सुद्धा बुलडाणा शहरामध्ये पाच पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बुलडाणा शहरातील मच्छी ले आऊटमध्ये एक पुरुष, जोहर नगर एक पुरुष, विष्णूवाडी एक महिला व एक पुरुष कोरोना बाधित आढळले आहेत. बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथेही एक कोरोना बाधित सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा फुगत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

Web Title: Coronavirus: 10 new positive in bulldozer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.