कोरोना काळात ग्राहक मंचामध्ये दुपटीने वाढला तक्रारींचा अेाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 11:48 AM2021-03-04T11:48:36+5:302021-03-04T11:48:43+5:30

Consumer Forum गेल्या संपूर्ण वर्षाचा विचार करता जिल्हा ग्राहक मंचात वर्षभरात ५०९ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

Complaints in the consumer forum doubled during the Corona period | कोरोना काळात ग्राहक मंचामध्ये दुपटीने वाढला तक्रारींचा अेाघ

कोरोना काळात ग्राहक मंचामध्ये दुपटीने वाढला तक्रारींचा अेाघ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा ग्राहक मंचमध्ये तक्रारींची संख्या २०१९ च्या तुलनेत  दुपटीने वाढली आहे. त्यातच यासंदर्भातील कायद्यात दुरुस्ती झाल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण मंचऐवजी आता त्यास ग्राहक तक्रार निवारण आयोग असे स्वरूप आले आहे. सोबतच याची व्याप्तीही नव्या कायद्यामुळे वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मार्च २०२० पासून सुरू झाले होते. गेल्या संपूर्ण वर्षाचा विचार करता जिल्हा ग्राहक मंचात वर्षभरात ५०९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १०५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ज्याचे प्रमाण २० टक्के आहे. २०१९ या वर्षात प्राप्त तक्रारींचा विचार करता २०२० मध्ये दुपटीने तक्रारी दाखल झाल्या होत्या. २०१९ मध्ये एकूण २७२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २६७ प्रकरणांत ग्राहकमंचाने निकाल दिले आहेत. प्रकरणे निकाली काढण्याचे हे प्रमाण तब्बल ९८ टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एकंदरीत कायद्यातील दुरुस्तीमुळे ग्राहक मंचाचे कार्यक्षेत्र व व्याप्ती वाढली आहे. बाजारमूल्यानुसार ज्या तक्रारींचे मूल्य हे २० लाखांच्या जवळपास आहे, अशा तक्रारीही येथे आता नव्या दुरुस्तीमुळे करता येत आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षण व त्यांचे हित जपण्यास एक मोठी मदत मिळत आहे. 


व्याप्ती वाढली
ग्राहक मंचास आता नव्या कायद्यानुसार ग्राहक तक्रार निवारण आयोग संबोधण्यात येत आहे. सोबतच या नव्या कायदयानुसार ग्राहक मंचाची व्याप्ती वाढली आहे. द कन्झ्युमर प्राटेक्शन ॲक्ट- २०१९ नुसार हा बदल झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.


प्रामुख्याने या तक्रारी होतात दाखल
पीक विमा, नॅशनल इन्श्युरन्स, अेारिएनटल इन्शुरन्स, शेतकरी अपघात विमा, बियाणे कंपन्याविरोधातील दावे, इलेक्ट्रीकल आणि होम अप्लायन्ससंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

Web Title: Complaints in the consumer forum doubled during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.