बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 11:10 AM2020-08-11T11:10:41+5:302020-08-11T11:11:02+5:30

प्रस्तावास लगेचच मान्यता देऊ असे आश्वासन देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे.

CM gives 'green signal' to medical college at Buldana | बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’

बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनामुळे सर्वच कामांमध्ये आॅनलाइन तंत्राचा वापर होत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण करण्यात येत असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बुलडाणा येथील कोव्हिड १९ रूग्णालयाच्या ई-लोकार्पणप्रसंगी केले. बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास लगेचच मान्यता देऊ असे आश्वासन देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे.
बुलडाणा येथील कोव्हिड समर्पित रूग्णालय व देऊळगांव राजा येथील कोव्हिड हेल्थ सेंटरचे ई-लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि. प. अध्यक्षा मनिषाताई पवार, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई- लोकार्पण करून दोन्ही रूग्णालय उपलब्ध सुविधांची चित्रफीत दाखविण्यात आली. तंत्रज्ञानामुळे सगळे जण आपपल्या ठिाकाणाहून कार्यक्रमात सहभागी होत आहेत. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरू ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे लोकांचे प्राण वाचविणे हे ही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अत्यंत महत्त्वाचे काम सर्वांच्या सहभागातनूच होऊ शकते. सगळ्यांच्या सहभागातूनच हा ‘गोवर्धन’ आपण उचलु शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.


कोविड चाचणी प्रयोगशाळा लवकरच होणार सुरू
पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा येथील स्त्री रूग्णालय व देऊळगांव राजा येथील कोव्हिड केअर सेंटर इमारतीची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. जिल्ह्यात कोव्हिड चाचणी प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू असून ते ही लवकरच पुर्णत्वास येईल, अशी माहिती दिली. त्याच बरोबर या आरोग्य सुविधांच्या निर्मितीमुळे कोव्हिड रूग्णालय व कोव्हिड केअर सेंटर येथे अनुक्रमे १०० व २० खाटांची सोय झाल्याचेही स्पष्ट केले.


आरोग्य विभागांतील रिक्त पदे भरणार
केवळ अद्यावत सुविधा उपलब्ध केल्या म्हणजे रूग्ण बरा होत नाही. त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ यासारख्या प्रशिक्षीत मनुष्यबळाची निर्मितीही आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांतील रिक्त पदे भरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: CM gives 'green signal' to medical college at Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.