नागरिकांनी नियमांचे पालन करावे : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:38+5:302021-02-23T04:52:38+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. ...

Citizens should follow the rules: Guardian Minister | नागरिकांनी नियमांचे पालन करावे : पालकमंत्री

नागरिकांनी नियमांचे पालन करावे : पालकमंत्री

googlenewsNext

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. पालकमंत्री डाॅ. शिंगणे यांना १६ फेब्रुवारी रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेण्यात आले. उपचाराअंती २२ फेब्रुवारी राेजी ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून २००, ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठेही बेफिकिरी दाखवू नये. प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. त्यासाठी शासनाने घालून दिलेले नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रत्येकाने घराबाहेर पडल्यानंतर मास्क किंवा स्वच्छ रूमाल तोंडावर वापरावा, वारंवार हात स्वच्छ धुवावे किंवा सॅनिटाइज करावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे तथा गर्दीमध्ये जाणे टाळावे या त्रीसूत्रींचा प्रत्येकाने अवलंब करावा. या त्रीसूत्रींचा अंगीकार करीत कोरोना संसर्गपासून स्वत:चे व कुटुंबीयांचे संरक्षण करावे, असे भावनिक आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

रुग्णालयातून घेत होते जिल्ह्याचा आढावा

१६ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेथे उपचार सुरू असताना ते दररोज जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहून जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेत होते.

Web Title: Citizens should follow the rules: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.