Chief Minister visit Gajanan Maharaj's temple at Shegaon | मुख्यमंत्र्यांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन
मुख्यमंत्र्यांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन

 
शेगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शनिवार, २४ आॅगस्टरोजी बुलडाणा जिल्ह्यात आले होते. दरम्यान त्यांनी शेगावात सायंकाळी ५ वाजता गजानन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठ दादा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिश महाजन, कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील,  खामगाव मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंदिरात आगमन होताच विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत झाले. भाविकांना त्यांनी हात जोडून स्वागत स्वागत स्विकारले.


Web Title: Chief Minister visit Gajanan Maharaj's temple at Shegaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.