सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे तापमान वाढले - पंजाबराव डख पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 07:23 PM2021-08-19T19:23:28+5:302021-08-19T19:23:42+5:30

Cement concrete roads raise temperature : सिमेंटचे रस्ते बनल्याने तापमान वाढले आणि एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला.

Cement concrete roads raise temperature - Punjabrao Dakh Patil | सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे तापमान वाढले - पंजाबराव डख पाटील

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे तापमान वाढले - पंजाबराव डख पाटील

googlenewsNext

 -   नानासाहेब कांडलकर
जळगाव जामोद :पूर्वी पाऊस येण्याचे काही ठोकताळे होते.शेतकरी वर्ग त्यानुसार पेरणी करीत असे आणि त्या वेळी शेतकर्‍यांनी अंदाज केल्याप्रमाणे पाऊस बरसत असे.काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली,सिमेंटचे रस्ते बनल्याने तापमान वाढले आणि एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला.त्यामुळे एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ढगफुटीच्या प्रमाणात वाढ असे विसंगत चित्र निर्माण झाले आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी आपले जुने तंत्र वापरावे असे आवाहन हवामानाचे अभ्यासक पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.
        श्री संत सखाराम महाराज संस्थान इलोरा येथे हवामानातील बदल व पाऊस पाणी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले पाऊस येण्याची काही लक्षणे आहेत.दिवस मावळत असतांना आकाश तांबडे झाले तर 72 तासात पाऊस येतो.गर्मी वाढल्यास बहात्तर तासात पाऊस येण्याची शक्यता असते तसेच चिमण्यांनी धुळीत आंघोळ केल्यास 72 तासात पाऊस येतो.जेव्हा पावसाचे ढग वाहतांना विमानासारखा आवाज येतो तेव्हा पाऊस येणार असे निश्चित समजावे. कावळ्याने आपले घरटे झाडाच्या शेंड्यावर केल्यास समजावे की यावर्षी पावसाळा कमी होणार आहे, झाडाच्या मध्यभागी केल्यास समजावे पावसाळा जास्त होणार आहे.उन्हाळ्यात 15 मे ते 30 मे दरम्यान पाऊस झाल्यास पेरणी योग्य पाऊस वेळेवर होईल असा अंदाज व्यक्त करावा,असे काही ठोकताळे पंजाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

गारपीट होण्याची स्थिती
 साधारणपणे 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या दरम्यान गारपीट होते.42 हजार 260 गावांपैकी फक्त शंभर गावांमध्ये गारपीट होते.जिथेडोंगराळ भाग आहे व धरण आहे तेथे गारपीट मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता असते.काळ्या कसदार जमिनीत शक्यतोवर गारपीट होत नाही.15 मे ते 30 मे च्या दरम्यान वीज पडण्याचे प्रमाण जास्त असते. साधारणपणे नारळाचे झाड,आंब्याचे झाड, मंदिराचा कळस व जनावरे यावर व वीज पडण्याचे प्रमाण मोठे असते.वीज पडतांना लाकडावर किंवा गवताच्या पेंडी वर उभे राहिल्यास अंगावर वीज पडण्याचा धोका टळतो.

Web Title: Cement concrete roads raise temperature - Punjabrao Dakh Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.