बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाच्या दररोज २,८०० चाचण्या करण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:24 PM2020-12-05T16:24:38+5:302020-12-05T16:26:45+5:30

Buldhana News चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सुयोग्य नियोजन आरोग्य विभागाला करावे लागणार आहे.

Carrena plans to conduct 2,800 daily tests in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाच्या दररोज २,८०० चाचण्या करण्याचे नियोजन

बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाच्या दररोज २,८०० चाचण्या करण्याचे नियोजन

Next
ठळक मुद्देआरोग्य सचिवांनी सर्व जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत. दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता या दृष्टीने पावले टाकलेली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्यांचा वेग पुन्हा वाढविण्यात येत असून, आता दररोज २,८०० चाचण्या करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात आरोग्य सचिवांनी सर्व जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने दोन बैठकी घेऊन अनुषंगिक नियोजन केले असल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र बुलडाण्यातील प्रयोगशाळेची दिवसाची क्षमता १२०० चाचण्याची आहे. त्यामुळे या चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सुयोग्य नियोजन आरोग्य विभागाला करावे लागणार आहे.
आरोग्य विभागाच्या मानकानुसार राज्यात प्रतिदिन दीड लाख चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात मानकानुसार आता २,८०० चाचण्या कराव्या लागणार आहेत. कोरोना संसर्गाची दुसरी लाट जानेवारी येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना डिसेंबरमध्येच कोरोना चाचण्याचा वेग आणखी वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आल्या असल्याची माहिती आहे. दुसरीकडे गेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यात ९३ हजार संदिग्धांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे गेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यात ९३ हजार संदिग्धांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ११ हजार ४५६ जण कोरोना बाधित आढळून आले असून आतापर्यंत १३७ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाल आहे. दुसरीकडे दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता या दृष्टीने पावले टाकलेली आहेत. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात ३०९ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहे. नोव्हेंबरमध्ये एका दिवशी महत्तम स्तरावर १,८०० संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात ४ डिसेंबर राेजी सायंकाळी अधिकाऱ्यांची बैठकही झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: Carrena plans to conduct 2,800 daily tests in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.