बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी खामगावात धडक मोहिम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 06:31 PM2021-01-25T18:31:13+5:302021-01-25T18:31:56+5:30

Khamgaon News बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी खामगावात धडक मोहिम राबविण्यात येणार आहे.

campaign in Khamgaon to decepline unruly traffic! | बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी खामगावात धडक मोहिम!

बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी खामगावात धडक मोहिम!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्थेमुळे  वाहतूक कोंडी आणि अपघात वाढीस लागल्याचे निदर्शनास येताच पोलिस प्रशासनाकडून १ फेब्रुवारीपासून खामगाव शहरात धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान वाहन जप्तीसोबतच कठोर कारवाईचेही स्पष्ट निर्देश अपर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी येथे दिले.
खामगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न राहील आहेत. रस्त्यावरील फेरीवाले, किरकोळ साहित्य विक्रेते आणि चहा नास्त्यांच्या दुकानांसमोरील गर्दीसोबतच अवैध पार्कींग संदर्भातही पोलीस प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला आहे. मोहिमेदरम्यान, पोलीस प्रशासनाला असहकार्य करणाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यासोबतच वाहन जप्तीचीही कारवाई केली जाणार असल्याचे अपर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी स्पष्ट केले. या पत्र परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल हुड, वाहतूक शाखेचे भामोदकर आदींची उपस्थिती होती.


 जड वाहतुकीला निर्बंध!
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहरातील जड वाहतुकीलाही निर्बंध घालण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहतुकीस मज्जाव राहील. या कालावधीत जड वाहतूक करणाºयांवाहनासोबतच संबंधित व्यावसायिकांवरही कारवाई केली जाईल.


वाहतूक कोंडीचे  साक्षीदार
शहरातील सरकी लाईन भागातील वाहतूक कोंडीचे आपण स्वत: आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी साक्षीदार असल्याचे अपर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी यावेळी स्पष्ट केले. बुलडाणा बैठकीला जाताना सरकी लाइन भागात आपण अनेकदा वाहतूक कोंडीत अडकल्याची कबुलीही राजपूत यांनी यावेळी दिली.

 

Web Title: campaign in Khamgaon to decepline unruly traffic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.