बुलडाणा जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात; लस मात्र २० हजारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:38 PM2019-07-24T12:38:59+5:302019-07-24T12:39:05+5:30

गुरांची संख्या लाखोंच्या घरात असतानाही घटसर्प नावाची लस मात्र २० हजारच उपलब्ध झाली आहे. लसीकरणाच्या बाबतीत पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेमुळे मुक्या प्राण्यांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

In Buldana district millions of cattle in the houses; The vaccine is only 20 thousand | बुलडाणा जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात; लस मात्र २० हजारच

बुलडाणा जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात; लस मात्र २० हजारच

Next

- ब्रम्हानंद जाधव 
बुलडाणा: गुरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, पावसाळ्यापूर्वीच लसीकरण मोहीम राबविणे आवश्यक आहे. परंतू जिल्ह्यातील मुक्या प्राण्यांच्या अरोग्याची काळजी घेणाºया पशुवैद्यकीय विभागाकडेच पावसाळी लसीकरणाचा तुटवडा दिसून येत आहे. गुरांची संख्या लाखोंच्या घरात असतानाही घटसर्प नावाची लस मात्र २० हजारच उपलब्ध झाली आहे. लसीकरणाच्या बाबतीत पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेमुळे मुक्या प्राण्यांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. 
जनावरांच्या आरोग्याची भीस्त असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडे कधी लसींचा अभाव, तर कधी कर्मचाºयांची रीक्त पदे अशा एक, ना अनेक समस्या कायमच असतात. सध्या अर्धा पावसाळा आटोपलेला असतानाही जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी दुषित होणे, चाºयांवर किडीचा प्रादूर्भाव होणे असे प्रकार घडतात. याचा परिणाम गुरांवर होतो दुषित पाणी आणि किड लागलेला चारा खाण्यात गेल्याने विविध आजारांची लागण होते. त्यात घटसर्प या भयंकर आजाराचा समावेश आहे. या आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच असल्याने गुरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. अशा परिस्थितीत पशू संवर्धन विभागाकडून लसीकरण मोहिम राबविण्यासह गुरांची नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते; परंतु पशू संवर्धन विभागाकडून त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे दिसून येते. मागील पशुगणनेनुसार जिल्ह्यात १० लाख २० हजार ३७ पशुधन आहे. त्यामध्ये गायवर्ग व म्हैसवर्ग ५ लाख ६७ हजार ७३३, शेळ्यांची संख्या २ लाख ८४ हजार १७, मेंढ्यांची संख्या १ लाख ७ हजार ३० आहे. 
जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने पशुधन असतानाही जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे घटसर्प नावाच्या केवळ २० हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. जनावरांच्या संख्येच्या तुलनेत लसीचे प्रमाण अत्यल्प आहे. लसीकरणाअभावी जिल्ह्यातील लाखो जनावरांना पावसाळ्यात उद्भवणाºया आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

 
जिल्ह्यासाठी १६ हजारावर एकटांग्या लस उपलब्ध 
दोन वर्षाखालील जनावरांना पावसाळ्यामध्ये एकटांग्या नावाची लस दिल्या जाते. जिल्ह्यात छोट्या जनावरांची संख्या सुद्धा लाखोंच्याच घरात आहे. मात्र एकटांग्या नावाची लस अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. पावसाळ्यात जनावरांच्या लसीकरणासाठी एकटांग्या नावाची १६ हजार ३५० लस जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली आहे. तर घटसर्प नावाची लस २० हजारावर उपलब्ध झाल्याची माहिती आहे. ह्या दोन्ही प्रकारच्या लसींचे जिल्हाभरातील पशुवैद्यकीय संस्थांना वाटप करण्यात आलेली आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून सध्या गावोगावी गुरांचे लसीकरण सुरू असल्याची माहिती आहे. परंतू जनावरांच्या तुलनेत ही लस अत्यंत कमी आहे. 


पुणे येथून येते लस, महिना अखेरपर्यंत इतर लस येणार
पशुंना पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होऊ नयेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी जनावरांना प्रतिबंधात्मक लस दिली जाते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. जिल्ह्यातील पशुधनाकरीता दिली जाणारी लस ही पुणे येथून येत असते. पावसाळ्यात जनावरांना विशेष करून घटसर्प, एकटांग्या, चौखुरा, आंत्रपिशार, शेळ्यांची पीपीआर, शेळ्या, मेंढ्यांवर येणारा देवी रोग आदी संसर्गजन्य रोगांचा प्रसार होते. यामुळे कित्येक जनावरे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता राहते. या सर्व रोगांपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पावसाळा लागताच लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाच्या मार्फत पशुसंवर्धन विभागाला औषध व लस पुरवठा केला जातो.


पशुगणनेचा आकडा गुलदस्त्यात
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पशुगणनेचा आकडा अद्यापही जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध झाला नाही. पशुगणनेची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन असल्याने जिल्ह्यातील पशुंची संख्या आॅनलाइनच उपलब्ध होईल अशी माहिती सुत्रांनी दिली. परंतू अद्याप जिल्ह्यातील पशुगणनेची संख्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. 

जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू आहे. सध्या घटसर्प लस २० हजार व एकटांग्याची १६ हजार ३५० लस उपलब्ध झाली आहे. उर्वरीत लस लवकरच उपलब्ध होईल. पुण्यावरून ही लस येते. त्यामुळे त्यांच्याकडून उपलब्ध झाल्यास ते लगेच कळवतात. आॅगस्टपर्यंत ही लस देणे आवश्यक आहे.  
- डॉ. पुरूषोत्तम सोळंके, 
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विभाग, बुलडाणा.

Web Title: In Buldana district millions of cattle in the houses; The vaccine is only 20 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.