बुलडाणा जिल्ह्यात १५ हजार शेतकऱ्यांचा मका घरात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:10 AM2020-08-04T11:10:49+5:302020-08-04T11:11:08+5:30

अडचणीच्या काळात जिल्ह्यातील १५ हजार शेतकºयांचा मका आता घरात पडून आहे.

In Buldana district, maize of 15,000 farmers at home | बुलडाणा जिल्ह्यात १५ हजार शेतकऱ्यांचा मका घरात पडून

बुलडाणा जिल्ह्यात १५ हजार शेतकऱ्यांचा मका घरात पडून

Next

- ब्रम्हानंद जाधव  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मका खरेदीसाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली होती. परंतू राज्य शासनाचे मका खरेदीचे ‘टार्गेट’ पूर्ण झाल्याने जिल्ह्यात मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदरच खरेदी बंद करण्यात आली. हमीभावाने मका खरेदीसाठी नोंदणी केलेल्या ८२ टक्के शेतकऱ्यांचा मका खरेदी झालेला नाही. त्यामुळे अडचणीच्या काळात जिल्ह्यातील १५ हजार शेतकºयांचा मका आता घरात पडून आहे.
जिल्ह्यात सुरूवातीपासूनच मका खरेदी वांध्यात आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊनमुळे मिल्स बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेती विषयक बरदाण्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. बरदाण्या अभावी मका खरेदीला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी हमीभावाने मका खरेदीला यंदा विलंब लागला. जूनमध्ये राज्य शासनाने मका खरेदी सुरू केली. त्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यात १३ केंद्रावर मका खरेदी सुरू होती. परंतू नोंदणीसाठी अनेकांना अडचणी आल्या. नोंदणीनंतर मका खरेदी संथगतीने होत असल्याने केंद्रावर शेतकºयांची गर्दी वाढत होती. बाजार समितीसमोर मका घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकºयांनी मका खरेदीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ १८ टक्के म्हणजे ३ हजार २८० शेतकºयांचीच मका खरेदी पूर्ण झालेली आहे. सध्या नोंदणी केलेल्यांपैकी १५ हजार ३९३ शेतकºयांचा मका खरेदी झालेली नाही.
राज्य शासनाने ठरवून दिलेले मका खरेदीचा लक्षांक लवकरच पूर्ण झाल्याकारणारे प्रशासनाने मुदत संपण्याची वाट न बघता ३० जुलै रोजीच मका खरेदीची प्रक्रिया बंद केली. राज्य शासनाच्या मका खरेदी लक्षांकाचा जिल्ह्यातील शेतकºयांना मोठा फटका बसला आहे. नोंदणी केलेल्या ८२ टक्के शेतकºयांना पुन्हा मका खरेदी सुरू होण्याची अपेक्षा आहे.


१.८२ लाख क्विंटल मका खरेदी
जिल्ह्यातील ३ हजार २८२ शेतकºयांचा १ लाख ८२ हजार ३२७ क्विंटल मका खरेदी ३० जुलैपर्यंत करण्यात आली आहे. मका खरेदीसंदर्भात नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी ४ हजार १३५ शेतकºयांना एसएमएस पाठविण्यात आले होते. तर १४ हजार ७४१ शेतकºयांना एसएमएस पाठविणे बाकी आहे.

खरेदीवरून रणकंदन
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी निम्म्या शेतकºयांचाही मका शासन खरेदी करू शकले नाही. त्यामुळे मका खरेदीच्या कारणावरून सध्या जिल्ह्यात रणकंदन बघावायास मिळत आहे. लोकप्रतिनिधींसह शेतकरी आक्रमक भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाºयांच्या दालनात मका टाकण्याचा गंभीर इशाºयाने प्रशासनही हादरले आहे.

Web Title: In Buldana district, maize of 15,000 farmers at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.