बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ३५९ जणांना दिली काेविशिल्ड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 11:57 AM2021-01-20T11:57:58+5:302021-01-20T11:58:19+5:30

Corna Vaccine बुलडाणा केंद्रात २७, चिखली ६५, देउळगाव राजा ६९, खामगाव ६३, मलकापूर ५२ आणि शेगाव येथे ८३ जणांना काेविशिल्ड लस देण्यात आली आहे.

In Buldana district, 359 people were vaccinated on the second day | बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ३५९ जणांना दिली काेविशिल्ड लस

बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ३५९ जणांना दिली काेविशिल्ड लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाभरात काेविशिल्डचे १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ३३९ जणांना लस देण्यात आली आहे. काेराेना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून आराेग्य कर्मचाऱ्यांना काेविशिल्ड लस देण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती आणि जि. प. उपाध्यक्षा कमल बुधवंत यांच्या उपस्थितीत काेराेना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात सहा केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. आठवड्यातून चारच दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार मंगळवारी बुलडाणा केंद्रात २७, चिखली ६५, देउळगाव राजा ६९, खामगाव ६३, मलकापूर ५२ आणि शेगाव येथे ८३ जणांना काेविशिल्ड लस देण्यात आली आहे. जिल्ह्याला काेराेनाचे १९ हजार डाेस मिळाले आहेत. पहिल्याच दिवशी सहा केंद्रांवर ६०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले हाेते. त्यापैकी ५७५ जणांना प्रत्यक्षात लस देण्यात आली. पहिल्या दिवशी लसीकरणात जिल्हा राज्यात तिसरा आला हाेता. या आठवड्यात बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी लसीकरण हाेणार आहे. १४ हजार आराेग्य कर्मचाऱ्यांनी  नाेंदणी केली आहे.


आरोग्य अधिकाऱ्यांनी  घेतली कोविडची लस
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी मंगळवारी कोविडची लस घेतली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस व संबंधित व्यक्तींचे  लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यातील सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना कोविडची लस घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: In Buldana district, 359 people were vaccinated on the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.